loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र आणि गोव्यात भरपूर पाऊस, सरासरीच्या 103 % मान्सून बरसणार

नवी दिल्ली- भारतातील आघाडीची हवामान विषयक अंदाज करणारी संस्था स्कायमेटनं मान्सून 2025 साठीचा अंदाज जाहीर केला आहे. स्कायमेटनं मान्सूनचा येणारा हंगाम सामान्य राहील, असे म्हटले आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा पाऊस सरासरीच्या 103 टक्के होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये 5 टक्क्यांची वाढ किंवा घट होऊ शकते. जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन सरासरी 868.6 एमएम पाऊस पडेल. महाराष्ट्र आणि गोव्यात भरपूर पाऊस पडेल असेही या अंदाजात म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्कायमेटचे जतिन सिंह यांच्या मते, अल निनो या हंगामात कमकुवत आणि संक्षिप्त असेल. अल निनोचे चिन्ह आता धुसर होत आहे. मान्सूनवर विपरीत परिणाम करण्यार्‍या अल निनोची शक्यता नाकारण्यात आली आहे. अल निनो दक्षिणी दोलन फार न्यू्ट्रल राहणार असल्यानं भारतात मान्सूनच्या पावसावेळी तो प्रभावी घटक ठरणार आहे. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसर्‍या टप्प्यात चांगला पाऊस होऊ शकतो, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. अएलनिनोशिवाय इतर घटक देखील मान्सूनवर परिणाम करत असतात. आयओडी (इंडियन ओसियन डायपोल) सध्या प्रभावहीन असून यामुळं मान्सूनच्या सुरुवातीसाठी सकारात्मक चित्र आहे. एलनिनो दक्षिणी दोलन आणि आयओडी दोन्ही मान्सूनच्या प्रवासावर परिणाम करतात. चार महिन्यांपैकी अर्धा कालावधी झाल्यानंतर मान्सूनला अधिक वेग मिळू शकतो.

टाइम्स स्पेशल

स्कायमेटच्या अंदाजानुसार पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रत पुरेसा पाऊस होईल. पश्चिम घाटात प्रामुख्यानं केरळ, कर्नाटकचा किनारपट्टीचा भाग आणि गोव्यात अधिक पाऊस होईल. उत्तरेकडील राज्य आणि पर्वतीय भागात सरासरीच्या पेक्षा कमी पाऊस होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg