loader
Breaking News
Breaking News
Foto

आधारबाबत मोठा निर्णय, आता कार्डची गरज नाही?

नवी दिल्ली- भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने नवीन आधार कार्ड अ‍ॅप चाचणी टप्प्यात लाँच केले आहे. जर ही चाचणी यशस्वी झाली, तर लवकरच तुम्हाला तुमच्या आधार कार्डची किंवा प्रत्यक्ष कार्डची फोटो प्रत बाळगण्याची गरज भासणार नाही. मोदी सरकारच्या या नवीन उपक्रमांतर्गत, आता क्यूआर कोड आणि फेस आयडीद्वारे आधार त्वरित ओळखता येणार आहे. हे अ‍ॅप आधारची सुरक्षा मजबूत करतेच पण ते वापरणे देखील सोपे असल्याचे सांगण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आता तुम्हाला हॉटेल चेक-इन, प्रवास किंवा खरेदी करताना आधारची छायाप्रत देण्याची आवश्यकता नाही. नवीन आधार अ‍ॅपसह, तुमचा आधार पूर्णपणे डिजिटल होईल आणि तो फक्त तुमच्या परवानगीनेच शेअर केला जाऊ शकतो. या अ‍ॅपद्वारे, तुम्ही तुमचा आधार कार्डचा क्ूयआर कोड स्कॅन करून त्वरित पडताळणी करू शकता. या अ‍ॅपची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचा टठ कोड आणि फेस आयडी आधारित पडताळणी. ज्याप्रमाणे आपण यूपीआय पेमेंट करताना टठ कोड स्कॅन करतो, त्याचप्रमाणे आधार पडताळणीसाठी क्ूयआर कोड स्कॅन करता येतो आणि फेस आयडी वापरून तुमची ओळख त्वरित पडताळता येते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg