मुंबई- मुंबईत प्रचंड उकाडा वाढला असतानाच मुंबई महापालिकेने 2 महिन्यांनंतर मुंबईवर ओढवणार्या संकटाबाबत पूर्वसूचना दिली आहे. मुंबईतील अथांग समुद्राला यावर्षीच्या पावसाळ्यात तब्बल 18 दिवस मोठे उधाण येणार असून त्यापासून सावध राहण्याच्या आणि खबरदारी घेण्याच्या सूचना महापालिकेने जाहीर केल्या आहेत.
मुंबईत सध्या उकाडा अतिशय तीव्र झाला असून, घामाच्या धारांनी नागरिक असह्य झाले आहेत. एप्रिल महिन्यातच ही परिस्थिती असताना मे आणि जून महिन्यापर्यंत शहरातील उकाडा आणखी किती तीव्र होणार, याचीच भीती नागरिकांना आणि प्रशासनालाही सतावू लागली आहे. हीच भीती असताना आता राज्याच्या मुंबईसह आणखीही किनारपट्टी भागांवर घोंगावणार्या संकटाची पूर्वसुचना पालिकेच्या वतीनं जारी करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीचा पावसाळा अधिक दमदार होणार असून राज्यासह मुंबई शहरातील समुद्राला 18 दिवस मोठं उधाण येणार आहे असा इशारा आतापासूनच जारी करण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर महिन्यांत समुद्रात येणार्या उधाणामुळे साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळं संभाव्य धोका पाहता मुंबईकरांनी खबरदारी म्हणून समुद्रकिनारे, मरिन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया इथं गर्दी न करता योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन पालिकेच्या आपत्कालीन विभागानं केलं आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.