loader
Breaking News
Breaking News
Foto

आंब्याचे मार्केटमध्ये आगमन, दर घसरले

नवी मुंबई,- आंबा हा फळांचा राजा आणि आंब्याचा राजा हापूस. एप्रिल महिना सुरू झाला की हापूसची चव चाखण्यासाठी खवय्ये आतुर होतात. उन्हाळा हा खवय्यांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन येतो कारण की या महिन्यात मोठ्या प्रमाणात बाजारांमध्ये आंब्याची आवक वाढते. यंदाही मोठ्या प्रमाणावर हापूस आंबा मार्केटमध्ये आला असून त्यामुळे गुढीपाडव्यानंतर आंब्याच्या दरात घसरण झाल्याचे पहायला मिळते आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हापूसची आवक देखील बाजारात मोठ्या प्रमाणात वाढली असून खवय्यांसाठी, विशेषतः हापूस प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे हापूस आंब्याच्या दरात आता मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.खरे तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारात हापूस आंब्याला विक्रमी भाव मिळाला होता. त्यावेळी हापूस आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होता असे म्हटले तर काही अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण की तेव्हा हापूस च्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या होत्या.

टाइम्स स्पेशल

आता मात्र याच्या किमतीत घसरण झाली आहे आणि म्हणूनच हापूसची चव सामान्यांच्या आवाक्यात आली आहे अशा चर्चा बाजारांमध्ये सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राजधानीत हापूसच्या दरात मोठी घसरण झाली असून हापूसची जोरदार आवक होत आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये 8 एप्रिल 2025 रोजी हापूसची बंपर आवक झाली. तब्बल एक लाख हापूस आंब्याच्या पेट्या बाजारात दाखल झाल्यात. यामुळे आंब्याच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. गुढीपाडव्यानंतर प्रथमच हापूस आंब्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. खरे तर येत्या काही दिवसांनी राज्यात तसेच देशात अक्षय तृतीयाचा मोठा सण साजरा होणार आहे. अक्षय तृतीयाच्या सणाला महाराष्ट्रात पुरणपोळी आणि आमरसाचे वाण दिले जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg