loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत उष्णतेची लाट, चिपळूणचा पारा चाळीशीपार, पावसाची शक्यता

चिपळूणः- चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असून प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. चिपळूण शहरातील तापमानात सलग दुसर्‍या दिवशीही वाढ झाली आहे. यंदा एप्रिलमध्ये प्रथमच पारा चाळीशी पार गेला असून, बुधवारी (ता. 9) चिपळूणमधील कमाल तापमान 40.3 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे दुपारी नागरिकांनी बाहेर जाणे टाळले. त्यामुळे शहरातील रस्त्यावर गर्दी कमी होती. कोकण कृषी विद्यापीठाकडून आलेल्या अंदाजानुसार, कोकण विभागात 13 ते 19 एप्रिलदरम्यान पावसाची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चिपळुणात सकाळी 9 वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवू लागतो. दुपारच्या सुमारास उन्हाचा तडाखा आणखी वाढतो. उन्हाच्या तीव्रतेमुळे काम असेल तरच नागरिक घराबाहेर फिरताना दिसत होते. त्यामुळे रस्त्यावरही तुरळक गर्दी होती. बाहेर पडणारे नागरिकही टोपी, स्कार्फ, सनकोट, गॉगल असा पेहराव करूनच बाहेर पडत होते. उन्हामुळे अंगाची काहिली होत असल्याने नारळपाणी, थंड पेय, सरबत, ताजी फळे यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हीच परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात अन्य तालुक्यांतही जाणवत आहे. रत्नागिरी शहरामध्येही दुपारच्या सुमारास मुख्य रस्त्यावर वाहनांची गर्दी दिसत आहे; मात्र दुचाकीच्या तुलनेत चारचाकी वाहनांचे प्रमाण वाढलेले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg