loader
Breaking News
Breaking News
Foto

मिनी महाबळेश्वरचा पारा चढला

दापोली ः- मिनी महाबळेश्वर म्हणून सर्वदुर ओळख असलेल्या दापोलीच्या तापमानाचा पारा गेल्या 3 दिवसांपासून सतत वाढत चालला आहे. उकाडयाची काहिली सहन होत नसल्याने लोक शितपेयाचे अधिक सेवन करु लागले आहेत. त्यात स्वस्त आणि मस्त वाटणारे थंड लिंबू सरबत पिण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. आता गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकालाच आहारात हवी असलेली लिंबाची फोड ही दापोलीतील अनेक हॉटेल तसेच नास्ता सेंटर मध्ये पैसे देवून वा पैसे देतो सांगूनही काही ठिकाणी लिंबाची फोड मिळत नाही कारण लिंबाची वाढलेली किंमत त्यांना परवडत नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान केंद्रावर मंगळवारी 8 एप्रिल 2025 रोजी कमाल तापमान (अं.सें.)- 32.3 , किमान तापमान (अं.सें.)- 20.6 , सापेक्ष आर्द्रता (स.)- 93% , सापेक्ष आर्द्रता (दु.)- 66% , वार्‍याचा वेग(कि.मी./तास)- 4.3,सुर्यप्रकाश (तास/दिन)- 9.9 , बाष्पीभवन (मि.मी./दिन) 4.1, पर्जन्यमान (मागील 24 तासांचे,मि.मी.) 0.0 , एकूण पर्जन्यमान (मि.मी.)-0.0 , गत वर्षाचे तारखेस कमाल तापमान (अं.सें.)- 36.0 , किमान तापमान (अं.सें.)- 14.0 , तर बुधवारी 9 एप्रिल 2025 रोजी कमाल तापमान (अं.सें.)- 33.9 , किमान तापमान (अं.सें.)- 21.0 , सापेक्ष आर्द्रता (स.)- 86% सापेक्ष आर्द्रता (दु.)- 68% , वार्‍याचा वेग(कि.मी./तास)- 4.6 , सुर्यप्रकाश (तास/दिन)- 9.8 , बाष्पीभवन (मि.मी./दिन) 4.0 , पर्जन्यमान (मागील 24 तासांचे,मि.मी.) 0.0 , एकूण पर्जन्यमान (मि.मी.)-0.0 , गत वर्षाचे तारखेस , कमाल तापमान (अं.सें.)- 35.7 , किमान तापमान (अं.सें.)- 18.6, त्याचप्रमाणे गुरुवारी 10 एप्रिल 2025 रोजी कमाल तापमान (अं.सें.)- 36.2 , किमान तापमान (अं.सें.)- 21.9 , सापेक्ष आर्द्रता (स.)- 85% , सापेक्ष आर्द्रता (दु.)- 65% , वार्‍याचा वेग(कि.मी./तास)- 4.7 , सुर्यप्रकाश (तास/दिन)- 9.9, बाष्पीभवन (मि.मी./दिन) 4.2, पर्जन्यमान (मागील 24 तासांचे,मि.मी.) 0.0, एकूण पर्जन्यमान (मि.मी.)-0.0 , गत वर्षाचे तारखेस कमाल तापमान (अं.सें.)- 33.2 , किमान तापमान (अं.सें.)- 18.5 असे ग्रामीण कृषि मौसम सेवा कृषि विद्या विभाग डॉ. बाळासाहेब सा्वंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या येथील हवामान विभागात तापमानाची नोंद झाली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg