loader
Breaking News
Breaking News
Foto

मोठी ‘डिल’ होणार! गृहमंत्री अमित शहा सुतारवाडीला येणार

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी रायगड दौर्‍यावर येत आहेत. हीच संधी साधून खा.सुनील तटकरे यांनी जबदरस्त राजकीय ‘खेळी’ आखली आहे. या दौर्‍यात ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडीतील ‘गीताबाग’ या निवासस्थानी भेट देणार आहेत. रायगडात सुरू असलेल्या पालकमंत्री पदाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी सुतारवाडीला जाण्याने शिवसेना शिंदे गटाची अस्वस्थता वाढणार आहे. या भेटीत गृहमंत्री शहा सुतारवाडीत सुग्रास भोजन करतील, आणि त्यानंतरच्या बैठकीत शहांकडून सहज लेकीसाठी ‘पालकमंत्रीपद’ हस्तगत करतील, अशी भिती शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी रायगड किल्ल्यावर येणार आहेत. किल्ले रायगडावर छ.शिवरायांना अभिवादन करून झाल्यानंतर ते विश्रांतीसाठी खासदार तटकरे यांच्या रोहा तालुक्यातील सुतारवाडी निवासस्थानी भेट देणार आहेत. अमित शहा यांनी खा.सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जाण्याचे ठरविल्याने शिवसेना शिंदे गट अस्वस्थ झाला आहे. यामुळे विशेषत: महाडचे आमदार व मंत्री भरत गोगावले यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखेच झाले असल्याचे बोलले जात आहे.

टाईम्स स्पेशल

रायगडच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्यालाच पालकमंत्रीपद मिळाले पाहिजे, असा मंत्री भरतशेठ गोगावले यांचा आग्रह आहे. या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी अमित शहा यांना स्वत:च्या घरी येण्याचे दिलेले निमंत्रण अमित शहा यांनी स्वीकारल्याने शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg