पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे सातत्य कायम राहिले आहे. दोन दिवसांपूर्वी अंडरपास मार्गवर टँकर पलटी झाल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच मुंबईकडून पोलादपूरकडे भरधाव वेगाने जाणार्या आयशर टेम्पोची ठोकर दुचाकीला बसल्याने या अपघातात दुचाकीवरील चालक व सहकारी गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार याचा माणगांव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर 3 गंभीर जखमींना मुंबई येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी गणेश महादेव येरुणकर, (41) रा. ताबंडभुवन पोलादपूर याचा भाचा सुनिल सुरेश पवार हा त्याचे ताब्यातील अॅक्टीव्हा गाडी नं.एमएच 06 सीजी 4955 वरुन पत्नी व दोन मुले असे लोहारमाळ ते पोलादपुर मुबई-गोवा हायवेने पोलादपूर दिशेला जात होते. त्याचवेळी पाठीमागून येणारा आयशर टॅम्पो (क्र.एम.मच. 07 ओ.जे 2210) वरील चालक अतुल अजित कातवणकर, (35) रा.मिठबाग ता.देवगड जि.सिधुदुर्ग याने रात्रीच्या वेळेस भरधाव वेगाने टेम्पो मार्गस्त करत पुढे जाणार्या अॅक्टीव्हा गाडीला डाव्या बाजुने ओव्हरटेक केले. यावेळी अॅक्टीव्हा गाडीच्या डाव्या बाजुला ठोकर बसली.
या अपघातात दुचाकीस्वार सुनिल सुरेश पवार (41), सुवर्णा सुनिल पवार (39), श्लोक सुनिल पवार (13), रिया सुनिल पवार (10) सर्व रा.ताबंडभुवन पोलादपुर असे चार जण जखमी झाले. या सर्वांना सर्वप्रथम पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र जखमा गंभीर असल्याने चार जखमींना पुढे हलविण्यात आले. सुनील याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सुनीता व दोन मुलांना मुंबई येथील एमजीएमला हलविण्यात आले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.