loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेलात सोसायटीचा स्लॅब कोसळून 7 कामगार जखमी

पनवेल ः पनवेल शहरातील स्वामी नित्यानंद मार्गावरील पुनर्बांधणीचे काम सुरू असलेल्या कैलास पार्क सोसायटीचा 8 व्या मजल्याचा स्लॅब 9 एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पडून 7 कामगार जखमी झाले असून त्यामध्ये 2 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शहरातील कैलास पार्क सोसायटीचे पुनर्बांधणीचे काम सुरू असून या इमारतीचे आठव्या मजल्यावरील स्लॅब भरण्याचे काम 10 कामगार करीत होते. सदर काम सुरू असताना लेबर कॉन्ट्रॅक्टर, बांधकाम व्यावसायिक यांनी या ठिकाणी पुरेशी विजेची व्यवस्था न केल्यामुळे आणि सेंट्रींग काम व्यवस्थित नसल्याने येथील स्लॅब अचानकपणे बुधवारी रात्री 8.45 च्या सुमारास कोसळला.

टाईम्स स्पेशल

यावेळी बांधलेल्या संरक्षक जाळीमुळे तिसर्‍या मजल्यावर हा स्लॅब कोसळून त्यामध्ये 7 कामगारांना हात-पाय व डोक्याला जखमा झाल्या आहेत. त्यातील 2 कामगार हे गंभीर जखमी असून त्यांना त्वरित उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. यावेळी या कामगारांना आवश्यक सुरक्षिततेची साधने, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट न दिल्याने ते जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे, पो.नि. अभंग व पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. त्याचप्रमाणे पनवेल अग्नीशमन दलाचे जवानसुद्धा घटनास्थळी पोहोचले होते. सदर कामगारांची सुरक्षितता हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg