loader
Breaking News
Breaking News
Foto

नवी मुंबई विमानतळावर विमान नव्हे, धावली लॅम्बोर्गिनी कार!

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जो अजून सुरु झालेला नाही, मात्र त्याच्या धावपट्टीवर नुकतीच अशी एक घटना घडली आहे ज्याने संपूर्ण सोशल मीडिया गाजवून टाकला आहे. जगप्रसिद्ध सुपरकारपैंकी असलेली लॅम्बोर्गिनी या कारची नव्या विमानतळावर जबरदस्त स्पीड टेस्ट घेण्यात आली. विमानांच्या धावपट्टीवर मोटारीची स्पीड टेस्ट हीच एक वेगळीच गोष्ट असल्यामुळे सध्या या व्हिडिओला सर्वत्र उधाण आलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, लॅम्बोर्गिनीने केलेली एन्ट्री, तिचा वेग आणि मागे उडणारी धूळ हे सर्व दृश्य अत्यंत सिनेमॅटिक वाटते. काही सेकंदांतील या कारचा वेग पाहून अनेकांचे डोळे विस्फाटले होते. हा व्हिडिओ सध्या विविध सोशल मीडिया माध्यमांवर व्हायरल होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या खास क्षणाला पाहून प्रत्येकाने व्हिडिओला लाखोंचे लाईक्स आणि व्ह्यूज मिळवून दिलेले आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच जगभरातील लोकांनी आपली मते व्यक्त केली आहेत. त्यातील एका यूजरने यूजरने कमेंट केली, कधी काय करतील सांगता येत नाही.. तर दुसर्‍या यूजरने कमेंट केली, भारी आहे पण असं चालतं का..? शिवाय अन्य यूजर्संनी असे पहिल्यांदा पाहिले अशा अनेक कमेंट्स केलेल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg