loader
Breaking News
Breaking News
Foto

अल्पवधीत भरघोस परतावाच्या आमिषाने गमावले 49 लाख

पनवेल : सट्टा बाजाराशी कुठलाही संबंध नसताना केवळ फसवणुकीसाठी विविध अँपचे सहाय्य घेऊन एका व्यक्तीची तब्बल 49 लाख 94 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खारघर येथे राहणार्‍या एका व्यक्तीने समाज माध्यमात अल्पवधीत भरघोस परतावा मिळेल अशा आशयाची जाहिरात पाहिली. या जाहिरातीची लिंक उघडताच त्यांचा समावेश डीओ 1 आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड नावाच्या व्हॉटस ऍप समूहात झाला. गुंतवणूक कुठे केली किती केली किती परतावा मिळाला आहे हे पाहण्यासाठी म्हणून काही ऍप त्यांना डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार फिर्यादी यांनी ते डाउनलोड केले. तसेच बँकेची माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

17 फेब्रुवारी ते 24 मार्च दरम्यान 17 फेब्रुवारी ते 24 मार्च दरम्यान त्यांनी या ठिकाणी दिलेल्या विविध बँक खात्यात तब्बल 49 लाख 99 हजार भरले. त्यांना परतावा दिसत असला तरी प्रत्यक्षात तो त्यांच्या बँक खात्यात वळता होत नव्हता. फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तक्रार अर्ज दाखल केला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg