पाली/बेणसे: रणमर्द जिवाजी सर्कले नाईक आणि सरदार गोदाजी जगताप यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या कावल्या-बावल्या खिंडीत घडलेल्या शौर्याची कथा व गाथा ऐकून अंगावर रोमांच उभे राहतात. तब्बल सोळा तास कडवी झुंज देऊन वीरमरण पत्करलेल्या सर्कले नाईकांना अभिवादन करून सर्कले नाईक परिवार व दुर्गवीर प्रतिष्ठान संयुक्त विद्यमाने कावले-बावले खिंड शौर्य दिन झाला. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत ग्रामदेवतेचे व वीरगळ स्मारक पूजन करण्यात आले. बाल शिव व्याख्याती वृंदा सर्कले हिने सादर केलेला पोवाडा व स्फूर्तीगीतं वातावरण निर्मिती करून गेले. वीर रसात न्हाऊन निघालेले शिवव्याख्याते प्रतिक कालगुडे यांचे ओघवत्या शैलीतील व्याख्यान सर्वांना स्फूर्ती देऊन गेले.
घोडखिंड, उंबरखिंड, नेसरीची खिंड अशा कितीतरी खिंडी पराक्रमाने पावन झाल्या आहेत. त्यापैकीच एक कावळा बावळा खिंड.. एक छोटीशीच लढाई पण ती नसती झाली तर आज इतिहास वेगळा असता. पानशेतहून सह्याद्रीची कोकणदिवा कडून सांदोशी मार्फत रायगडला जाणारी वाट कावल्या-बावल्या खिंडीतून जाते. या घाटवाटेला कावल्या घाट असेही म्हणतात. औरंगजेबाने 11 मार्च 1689 ला शंभुराजांना ठार मारले. त्यानंतर लगेच औरंगजेबाच्या हुकुमानुसार जुल्फिकार खानाने रायगडास वेढा घातला. याचवेळी संपूर्ण राज घराणे येसूबाई, राजाराम महाराज, ताराबाई तसेच इतर दरबारी मंडळी रायगडावर अडकून पडले.
जुल्फिकार खानास मदत करण्यासाठी शहाबुद्दीन खान हा सरदार पानशेत हुन कावल्या-बावल्याच्या खिंडीतून रायगडकडे निघाला. त्या मोगली सरदाराची खबर सांदोशी गावातले गोदाजी जगताप व जिवाजी सर्कले नाईक यांना लागली. त्यांनी आपल्या नऊ साथीदारांसह शहाबुद्दीन खानास कावल्या-बावल्या खिंडीत गाठले आणि त्याचे खुप सैन्य कापून काढले. उरलेले सैन्य घेऊन शहाबुद्दीन औरंगजेबाकडे पळला. परिणामी राजाराम महाराज कड्यावरून सुरक्षित वाटेने सुटले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.