loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली खेड मार्गावरील वाकवली येथील दिशादर्शक नामफलकाची दुर्दशा

दापोली (शशिकांत राऊत) : दापोली आणि खेड या दोन महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणारा दापोली खेड हा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर वाकवली येथे मुंबई, पुणे, कोल्हापूर, कराड, चिपळूण आणि रत्नागिरी शहरांच्या ठिकाणांचे अंतर दर्शवणारा दिशादर्शक फलक सार्वजनिक बांधकाम विभागाने लावला आहे. सध्या या दिशादर्शक नाम फलकाची दुर्दशा झाली आहे. या दिशादर्शक फलकाचा काही भाग हा कोसळून पडला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत दिशादर्शक नामफलकाचा उर्वरित भाग हा कधी कोसळून खाली रस्त्यावर पडेल याचा नेम सांगता येणार नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातून खेड मार्गे चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा तसेच पाटण, कराड, सातारा, सांगली, वाई, महाबळेश्वर, कोल्हापूर, पंढरपूर त्याचप्रमाणे महाड, पोलादपूर, पुणे, मुबई आदी महत्वाच्या शहराकडे दररोज शेकडो प्रवासी खाजगी तसेच सरकारी वाहनांसह मालवाहू वाहने ही या रस्त्यावरून ये-जा करत असतात. अशाच दापोली खेड या महत्त्वाच्या मार्गावर दापोली तालुक्यातील वाकवली गावाच्या हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाने महत्त्वाच्या शहरातील अंतर समजावे यासाठी दिशादर्शक फलक उभारला आहे. सध्या याच दिशादर्शक नामफलकाची दुर्दशा झाली असून अर्धा अधिक नामफलक कोसळून खाली पडला आहे. तर दिशादर्शक नामफलकाचा काही भाग अजूनही लोंबकळत आहे तो कोसळून खाली कधी पडेल याचा काहीच नेम सांगता येत नाही. त्यामुळे नामफलक कोसळून पडल्याने मनुष्यहानी अथवा दुखापतीचा प्रकार घडू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वप्रथम नादुरुस्त नामफलकाची उर्वरित बाजू जी काही शिल्लक आहे ती अर्धी बाजू सार्वजनिक बांधकाम विभागाने काढून टाकावी म्हणजे धोका टळेल असे बोलले जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg