loader
Breaking News
Breaking News
Foto

कुचांबे येथे देशी-विदेशी दारू साठा जप्त

संगमेश्वर (प्रतिनिधी) : पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे येथील सुर्वेवाडी व मराठवाडी येथे मनोज उर्फ नाना पांडुरंग जागुष्टे यांच्याकडे गोल्डन व्हिस्की, गोल्डन ब्लॅक रम, स्ट्रॉंग बियर अशा एकूण 1780/..रुपये किमतीची बाटल्यांमधील देशी व विदेशी दारू व त्याचप्रमाणे विजय वसंतराव सुर्वे वय 52 वर्षे यांच्याकडे गोल्डन ब्ल्यू व्हिस्कीच्या 180 मिली मापाच्या 30 सील बंद बाटल्या यांची एकूण किंमत 900 रुपये इतका साठा उपरोक्त या दोघांनी विना परवाना आपल्याकडे केल्यामुळे पोलिसांनी रेड टाकून जप्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सोमनाथ आव्हाड पोलीस कॉन्स्टेबल/39 संगमेश्वर पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्टर नंबर62/2025 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम1949 चे कलम65 (ई) प्रमाणे विजय वसंतराव सुर्वे यांच्यावर तसेच गिरीजाप्पा लोखंडे पोलीस कॉन्स्टेबल/129 संगमेश्वर पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्टर नंबर63/2025 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम1949 चे कलम 65 ( ई) प्रमाणे मनोज उर्फ नाना पांडुरंग जागुस्टे यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले असून पोलीस हे. कॉन्स्टेबल/1402 के एम जोयशी ‌ संगमेश्वर पोलीस ठाणे यांनी सदर गुन्हे दाखल केले आहेत.

टाईम्स स्पेशल

सदर दोन्ही गुन्ह्यांचा अधिक तपास कर्तव्यदक्ष संगमेश्वर पोलीस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सी.टी. कांबळे, पो. कॉन्स्टेबल सोमनाथ आव्हाड, गिरीजा लोखंडे, के एम जोयशी करत आहेत. संगमेश्वर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गेली कित्येक दिवस अवैद्यरित्या सुरू असलेल्या दारू धंद्याला आळा बसत असल्याने परिसरातील महिला वर्ग व नागरिक सुखावला असून यांना एक प्रकारचा दिलासा मिळत असल्याने संगमेश्वर पोलिसांचे विशेषता पोलीस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg