loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन

वैभववाडी : वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्यावतीने सोमवार दिनांक 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन येथे विविध उपक्रमाणे साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ठीक 11 वाजता धम्म पूजा पाठ, सकाळी 11. 30 वाजता कवी साहित्यिक प्रकाश सकपाळ यांचे प्रबोधनपर मार्गदर्शन, तर दुपारी 12 वाजता वैभववाडी बाजारपेठेतून भव्य धम्म रॅली काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बुद्ध, भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रम तालुक्यातील कलाकार सादर करणार आहेत. या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन ग्रामीण अध्यक्ष भास्कर जाधव, सचिव रवींद्र पवार, महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा कांबळे, सचिव रुचिता कदम यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg