कणकवली (प्रतिनिधी)- सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॅग लिफ्टींग करणाऱ्या मध्यप्रदेश राज्यातील चार सराईत आरोपींना ब्रिझा कारसह स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकांनी केले शिताफीने जेरबंद केले.हॉटेलवर येणाऱ्या लक्झरी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगांमधील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लक्झरी बसमधुन बॅग लिफ्टींग करुन त्यातील दागिने व रोख रक्कम चोरी करुन घेवुन गेलेबाबत यापुर्वी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते.सदर गुन्ह्यांचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा राजेंद्र पाटील यांना आदेशित करुन नमुद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. वरीष्ठांकडुन प्राप्त सुचनांचे आधारे दि.10.04.2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेची दोन विशेष पथके कणकवली उपविभागात हायवे महामार्गाने गस्त घालत असताना असलदे येथील हॉटेल ग्रीनफिल्ड हॉटेल, ता. कणकवली येथे संशयितरित्या चार इसम वावरत आहेत. अशा मिळालेल्या माहितीवरुन तात्काळ गस्त करीत असलेली पथके हॉटेल ग्रीनफिल्ड येथे जावुन त्या चारही संशयित इसमांना त्यांचे ताब्यातील ब्रिझा कार क्रमांक MP-41-ZC-4641 सह सापळा रचून शिताफिने ताब्यात घेतले. त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी आपली नावे 1) जाहीर निजामुद्दीन खान, वय-40, रा. खेडवा, ता. मनावर, जि धार, राज्य-मध्यप्रदेश, 2) जाहीर आयुव खान, वय-40, रा. खेडवा, तहसिल मनावर, जि.धार, राज्य-मध्यप्रदेश, 3) रव्दर सोजर हुसैन, रा. सोजरखा, उखल्दा, उमर्बन, राज्य मध्यप्रदेश, 4) रफिक नियाज खान, वय-40, रा. उमर्वन, ता. मनावर, जि.धार, राज्य मध्यप्रदेश अशी असल्याचे सांगितले. तसेच ब्रिझा कारची पाहणी केली असता ब्रिझा कारचे मागे व पुढे MP-41-ZC-4641 अशी नंबरप्लेट असल्याचे दिसून आले. तसेच ब्रिझा कारची तपासणी केली असता कारच्या वरील छतामध्ये KA-12-MB-8170 च्या दोन नंबरप्लेट व GJ-01-KV-9366 च्या दोन नंबरप्लेट अशा एकुण चार बनावट नंबरप्लेट मिळुन आल्या. त्याबाबत अधीक चौकशी करता त्यांनी आपण हॉटेलवर येणाऱ्या लक्झरी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगांमधील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरण्यासाठी मध्यप्रदेश येथून आलेलो आहे. गरजेनुसार लोकांची व पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या नंबरप्लेटचा चलाखीने वापर करीत असतो. नंबरप्लेट असलेल्या फ्रेममध्ये चलाखीने पुवींची नंबरप्लेट काढुन दुसरी नंबरप्लेट लावतो. या सर्व नंबरप्लेटस् सनरुफ किंवा गाडीच्या वरील छतामध्ये आतल्या बाजुस न दिसतील अशा लपवुन ठेवण्यात येतात. वापरत्या गाडीच्या कमीत-कमी तीन ते चार चाव्या सोबत ठेवण्यात येत असुन आवश्यकतेप्रमाणे त्याचा वापर करण्यात येतो. याशिवाय गाडीकरीता वापर करण्यात येत असलेल्या सर्व नंबरप्लेटस् या त्याच वाहनाच्या प्रकाराशी जुळणाऱ्या असतात. या नंबरप्लेटस् ज्या जुन्या वापरत्या गाड्या वेगवेगळ्या ऑनलाईन संकेतस्थळांवर विक्रीसाठी उपलब्ध असतात अशा गाड्यांचे वेगवेगळ्या राज्यातील गाडी नंबर काढुन त्यानुसार बनविल्या जातात. तसेच हायवे वरील लक्झरी बसेस थांबणारी ठिकाणे चोरीसाठी टार्गेट केली जातात.तसेच नमुद आरोपींना अधिक विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली असता, त्यांनी यापुर्वी मुंबई गोवा हायवेवर कणकवली येथील असलदे, नांदगाव व ओसरगांव येथे लक्झरी बसमधुन बंग लिफ्टिंग करुन सोने व रोख रक्कम चोरुन घेवुन गेल्याचे कबुल केले. नमुद चारही आरोपी हे मध्यप्रदेश राज्यातील असुन आपल्या राहत्या ठिकाणांवरुन साथीदारांसह स्वतःचे मालकीच्या चारचाकी वाहनाने (ब्रिझा व क्रेटा) इ. सारख्या वाहनाने निघुन महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये लक्झरी बसेस थांबा असलेल्या हॉटेलच्या ठिकाणी बसमधील प्रवाशांच्या बॅगांची, रोख रक्कम व मौल्यवान वस्तुंची चोरी करतात. त्याअनुषगांने वरील चारही आरोपींच्या गुन्हा पध्दतीनुसार ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात व परराज्यात आवश्यकतेप्रमाणे पत्रव्यवहार करण्यात येत असुन पुढील तपास कणकवली पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, रामचंद्र शेळके, सहा. पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, गुरुनाथ कोयंडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल डॉमनिक डिसोझा, सदानंद राणे, प्रमोद काळसेकर, किरण देसाई, बस्त्याव डिसोझा, आशिष जामदार व चंद्रकांत पालकर, सर्व नेमणुक -स्थानिक गन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांनी केलेली आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.