loader
Breaking News
Breaking News
Foto

तळवडेत जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा ---

केळंबे लांजा (सिराज नेवरेकर)- तालुक्यातील तळवडे येथे आयुष्यमान आरोग्य मंदिरात जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तालुका आरोग्य अधिकारी लांजा, वैद्यकीय अधिकारी शिपोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. सदर शिबिरात तळवडेचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी प्रत्येकाच्या आयुष्यात रोजच्या जीवनात चांगला आहार, विहार व दिनचर्या हेच चांगले औषध आहे. तसेच नियमितपणे व्यायाम, योगासने, वयाच्या तीशीनंतर वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे हे आरोग्यदायी जीवनासाठी आवश्यक आहे. अशा सवयी प्रत्येकाने लावून घेतल्या तर त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य नक्कीच सुधारता येईल. तसेच भारत सरकारच्या अतिशय महत्वाच्या राष्ट्रीय संसर्गजन्य रोगाविषयी माहिती त्यांनी दिली. शिबिराची सुरुवात आरोग्यदायी सुरूवात.. आशादायी भविष्य.. या घोषवाक्याने झाली. तसेच यावेळी उच्च रक्तदाब, मधुमेह व रक्त तपासणी करण्यात आली. दरम्यान, शिबिरामध्ये तळवडे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी तळवडे ग्रामपंचायत सरपंच रोहिणी आंबेकर, माजी सरपंच संजय पाटोळे तसेच सुनिल पाटोळे, रूपेश पाटोळे, आरोग्य सेविका पी.पी.गोसावी, आरोग्य सेवक पी.एम.पाटोळे, रक्त संकलनासाठी क्रांती कांबळे, आशाताई संपत्ती पाटोळे, मदतनीस रोशनी पाटोळे तसेच अंगणवाडी सेविका, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg