loader
Breaking News
Breaking News
Foto

साखळोली शाळेतील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गट शिक्षणाधिकार्‍यांनी केला गौरव ---

दापोली (प्रतिनिधी)- दापोली पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या साखळोली नं.१ शाळेला अचानकपणे भेट देऊन त्यांनी पॅट चाचणी, शाळा दुरुस्तीचे काम, शालेय कामकाजाची पाहणी केली तसेच शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांचेशी हितगूज साधत समाधान व्यक्त केले. रत्नागिरी प्रज्ञाशोध परीक्षेत दापोली तालुका गुणवत्ता यादीत चमकलेल्या प्रज्ञावंत विद्यार्थी ऋग्वेद महेश लोवरे व प्रांजल प्रवीण नवरत, तसेच बी.डी.एस परीक्षेत रौप्य पदक मिळवणारी व मंथन परीक्षेत उज्वल यश संपादन करणारी तिसरीतील आद्या विनोद गोरीवले व सहावीतील सिया महेश देवघरकर ही मंथन परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल गट शिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी प्राविण्य प्राप्त विदयार्थ्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचा गौरव केला. साखळोली शाळा नं १ चे मुख्याध्यापक संजय मेहता यांनी गट शिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देत सन्मान केला. यावेळी संजय मेहता, समीर ठसाळ, संजय चोरमले, सुरेश पाटील आदि शिक्षकवृंद उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg