loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी स्टॅन्ड येथील रिक्षाचालक गणपत धावडे यांचे निधन ---

वैभववाडी (प्रतिनिधी)- एडगांव येथे ट्रक आणि रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले रिक्षाचालक गणपत काशीराम धावडे वय ५६ रा. करुळ भोयडेवाडी यांचे निधन झाले. त्यांच्यावर मुंबई येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आठ दिवसापूर्वी एडगांव येथे ट्रक व रिक्षा यांच्यात अपघात झाला होता. या अपघातात रिक्षा चालक गणपत धावडे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचाराला त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. म्हणून त्यांना नातेवाईकांनी मुंबई येथील केईएम रुग्णालयात हलवले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. २५ वर्षे ते वैभववाडी स्टॅन्ड या ठिकाणी रिक्षा चालक म्हणून परिचित होते. ते मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त होत आहे. वैभववाडी रिक्षा संघटनेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गणपत धावडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, भाऊ, नातू असा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg