loader
Breaking News
Breaking News
Foto

केळशी येथे जैन युवक मंडळ केळशी तर्फे महावीर जयंती उत्साहात साजरी ---

दापोली (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील केळशी ही एक प्रमुख व्यापारी बाजारपेठ आहे. या केळशी गावाला एक सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक वारसा असलेली फार जूनी पंरपरा आहे. सध्या हेच गाव पर्यटन दृष्ट्‌या विकसित होत आहे त्यामुळे या गावात पर्यटक येण्याचा ओघ चांगलाच वाढला आहे. अशा या गावात केळशी जैन युवक मंडळातर्फे भगवान महावीर जयंती उत्सव सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केळशी येथील जैन युवक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र बोहरा यांच्या निवासस्थानापासून भगवान महावीरांची भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीची सांगता केळशी बाजार पेठ, सोनार आळी येथून सुप्रसिद्ध महावीर भवन केळशी येथे मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात करण्यात आली. भगवान महावीर यांच्या रथ मिरवणुकी दरम्यान भगवान महावीरांच्या पुजेदरम्यान करण्यात आलेल्या आरतीतील श्रीफळांची बोली होते. या बोलीला येथे फार मोठी आणि जूनी परंपरा आहे. देवाचा प्रसाद म्हणून प्रत्येक जण या श्री फळांच्या बोलीतील लिलावात हिरीरीने भाग घेतो तसे यावेळीही उपस्थित जैन बांधवांनी भाग घेतला. केळशी येथील बाजार पेठेतून मोठ्या उत्साहात निघालेल्या भगवान महावीर रथ मिरवणुकीत महेंद्र बोहरा, राजेंद्र जैन, नरेंद्र कोठारी, संतोष कोठारी, दिलिप कोठारी, रुपेशकुमार बोहरा, निलेश बोहरा, राजेंद्र बोहरा, सुभाषशेठ बोहरा, बन्शीशेठ बोहरा, नितीन कोठारी, महेंद्र कोठारी, कुणाल बोहरा, प्रेम जैन, प्रतिक जैन, दिपूशेठ जैन, अमित कोठारी आदिंसह जैन समाज बांधव तसेच भगिनी वर्ग मोठ्या संख्येने आणि उत्साहात सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg