loader
Breaking News
Breaking News
Foto

शिक्षक संघ प्रणित जुनी पेंशन संघाच्या जिल्हाध्यक्षपदी आनंद रोहे यांची निवड

दापोली- म.रा.प्राथमिक शिक्षक संघ प्रणित जुनी पेन्शन प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी दापोली येथील आनंद रोहे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिपळूण येथे संपन्न झालेल्या जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात ही घोषणा करण्यात आली. श्री आनंद रोहे हे दापोली तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून गेली अनेक वर्षे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा दापोलीच्या माध्यमातून संघटनात्मक क्षेत्रात कार्यरत आहेत. दापोली तालुक्यासह रत्निगिरी जिल्ह्यात अनेक एन पी एस धारक बांधवांना संघटित करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम रोहे यांनी यशस्वीरित्या पार पडले आहे. त्यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेऊन जिल्हा शिक्षक संघाने त्यांची एनपीएस जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या निवडीमुळे संपूर्ण जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. आपल्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी आपण यशस्वीरित्या पार पाडू व आपल्या एन पी एस धारक बांधवांना योग्य तो न्याय मिळवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू अशी प्रतिक्रिया त्यांनी या निवडीनंतर बोलताना दिली आहे. त्यांची निवड होताच राष्ट्रीय प्रवक्ते जीवन सुर्वे, राज्यसंघाचे कार्याध्यक्ष संतोष कदम, दापोली तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप जालगावकर महेश गिम्हवणेकर, बाबू घाडीगावकर, विठ्ठल केदार, किशोर पाटील यांसह अनेक शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg