loader
Breaking News
Breaking News
Foto

मतदारसंघातील शहरांचा सर्वांगीण विकास साधणार : ना. योगेश कदम

खेड : मतदारसंघातील विकास हा केवळ रस्ते, नळपाणी योजना यांच्या पुरता मर्यादित न ठेवता राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या मदतीने सर्वांगाने करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन ना. योगेश कदम यांनी येथे केले. खेडमध्ये 10 रोजी सुमारे 50 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन ना. कदम यांच्याहस्ते झाले. यावेळी खेड नगर पालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे, शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे, शहर प्रमुख कुंदन सातपुते, संजय मोदी, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शहरातील गुलमोहर पार्क येथील शाळा व क्रीडांगण यासाठी राखीव मैदान विकसित करणे, मेहबूब महाडिक यांच्या घरासमोरील पालिकेच्या आरक्षित जागेवर क्रीडा संकुल उभारणे, शिवाजीनगर भागात दवाखाना विकसित करणे, खेड पंचायत समितीजवळ शिक्षक भवन उभारणे या कामासह 39 कोटी 35 लाख 88 हजार 391 रुपयांच्या नळपाणी योजनेचे भूमी पूजन ना. योगेश कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी माध्यमांसोबत संवाद साधताना ना. कदम म्हणाले, शहरांचा विकास करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नानुसार सर्व अंगांनी विकास कामे हाताळणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील शहरांमध्ये देखील शिक्षण, क्रीडा, आरोग्यविषयक दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने त्या दृष्टीने विकास योजना तयार केल्या आहेत. खेड, दापोली व मंडणगड शहरात केंद्र व राज्य सरकारच्या योजनेतून आपण कोट्यवधी रुपयांचा निधी आणण्यात यशस्वी झालो आहोत. त्यामुळे ही कामे पूर्ण होत असताना माझ्या मतदार संघातील शहरे नक्कीच सर्व सुविधांनी युक्त विकसित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg