loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वरच्या खाडीपट्‌ट्यात शेकडो झाडांची कत्तल; वनविभागाचे दुर्लक्ष?

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : संगमेश्वर-तालुक्यातील फुनगुस खाडीपट्‌ट्यात बेसुमार वृक्षतोड सुरू असून शेकडो झाडांची राजरोस कत्तल होत असताना वन विभाग मात्र या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याची ओरड ग्रामस्थांकडून होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड करण्यासाठी वन विभागाने परवानगी दिली का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी तसेच भविष्यात पाण्याचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्ये वृक्षतोड बंदी, तसेच जंगले अबाधित ठेवून डोंगर, जमिनीची धूप थांबवणे अशा उपाययोजनांचा समावेश देखील करण्यात आला आहे. परंतु शासनाच्या नियमांना चक्क धाब्यावर बसवून अखंड जंगले उध्वस्त केली जात आहेत. तसाच प्रकार संगमेश्वर तालुक्यातील फुनगुस गावात उघडपणे सुरू असल्याचे समोर आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वन विभागाने तात्काळ या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन ही बेसुमार वृक्ष तोड थांबवावी, वृक्षतोड करणार्‍यांवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करावी आणि संपूर्ण लाकूड साठा जप्त करण्यात यावा तसेच जितकी वृक्षतोड झाली आहे त्यापेक्षा दुप्पट नवीन वृक्षलागवड संबंधित व्यापार्‍यांकडून करून घ्यावी अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg