loader
Breaking News
Breaking News
Foto

यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी दोन्ही गणवेश !

संगलट (खेड)( इक्बाल जमादार) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महापालिका, जिल्हा परिषद यांसह अन्य पात्र शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी दोन गणवेशांचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्याची तब्बल २४८ कोटींहून अधिक रक्कम मंजूर करण्यात आली आहे. मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच शाळेत विद्यार्थी नव्या गणवेशात दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरवर्षी विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यानंतर गणवेश मिळण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागते. त्यावेळीदेखील एकच गणवेश विद्यार्थ्यांना दिला जातो. त्यानंतर पुढील काही महिन्यांमध्ये दुसरा गणवेश दिला जातो. यंदा पहिल्यांदाच यात बदल होणार आहे. त्यासाठी समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने पावले उचलली. पहिल्याच दिवशी दोनही गणवेशांचे वाटप करण्याचे निर्देश परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी महापालिकांचे आयुक्त आणि जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

टाइम्स स्पेशल

मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात यावी. केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत गणवेशाचा रंग व रचना संबंधित शाळा व्यबस्थापन समितीने निश्चित करावी, ज्या शाळांमध्ये स्काऊट, गाईड हा विषय आहे, अशा शाळांनी नियमित एका गणवेशाची रंगसंगती शाळा स्तरावर निश्चित करावी, तसेच, दुसरा गणवेश स्काऊट व गाईड संस्थेने निश्चित केलेल्या रंगसंगतीप्रमाणे खरेदी करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात येत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg