loader
Breaking News
Breaking News
Foto

बोरज धरण परिसरातील प्रदूषणप्रकरणी परेश शिंदे यांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

खेड (वार्ताहर) : तालुक्यातील बोरज या ठिकाणी ब्रिटिशकालीन धरणाशेजारी अज्ञात व्यक्तीने टाकलेली राख आणि केमिकलसंदर्भात स्थानिक ग्रामस्थ परेश शिंदे यांनी नुकतीच जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेतली. शासनाच्या शंभर दिवसाच्या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे खेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या ही बाब प्रत्यक्ष भेटून निदर्शनास आणली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी खेडचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांना संबंधित एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकार्‍यांना तत्काळ पत्र देऊन चौकशी करून कारवाईबाबत कळवण्यात सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेड तालुक्यातील बोरज धरण हे ब्रिटिशकालीन धरण असून संपूर्ण खेड शहराला वर्षातील सात ते आठ महिने गुरुत्वाकर्षण बलद्वारे पाणीपुरवठा होतो. आता याच धरणाच्या परिसरामध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने शेजारीच लोटे एमआयडीसीमधील राख आणि केमिकल्सचा गाळ टाकल्यामुळे येणार्‍या पावसाळ्यात तेच पाणी झिरपून धरणातील पाणीसाठा दूषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाले तर आज हजारो शहरवासियांच्या आरोग्याचा प्रश्नदेखिल समोर आला आहे. संबंधित जागा मालक, तसेच त्या ठिकाणी काही कंपन्यांमधून भरून आणलेली राख आणि केमिकलचा गाळ टाकणार्‍यांचा शोध घेऊन तत्काळ त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी तक्रार परिषद यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांच्याकडे केली आहे. या वेळी खेडचे प्रांत अधिकारी शिवाजी जगताप, तहसिलदार सुधीर सोनावणे, पोलीस निरीक्षक नितीन भोईर हे देखील उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg