loader
Breaking News
Breaking News
Foto

पालपेणे येथील श्री हनुमान प्रासादिक विकास मंडळ आयोजित आरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिर संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) : गुहागर तालुक्यातील पालपेणे (कुंभारवाडी) येथील श्री हनुमान प्रासादिक विकास मंडळ आयोजित संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम व बी.के.एल. वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी श्री हनुमान मंदिर जवळ शिबीर संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी समाजसेवक, वैद्यकीय टीम संस्थापक, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोषदादा जैतापकर, श्री हनुमान प्रासादिक विकास मंडळ पालपेणे मुंबईचे अध्यक्ष प्रवीण गुडेकर, संतोष दादा जैतापकर वैद्यकिय टीमचे प्रमुख संदीप खैर, सुधीर टेरवकर, संतोष पडवेकर, अरविंद पालकर, तुकाराम नांदगावकर, सरपंच योगिता पालकर, रसिका नांदगावकर वैद्यकीय टीमचे काशीराम पाष्टे दिनेश झगडे अविनाश माटल, प्रदीप खेतल, आदेश जाधव, मनोज डाफळे, पत्रकार गणेश किर्वे, वालावकर रुग्णालय डेरवणचे डॉ उत्कर्षा सिंग, डॉ. वैष्णवी कदम, डॉ.आर्या साळुंखे, डॉ.रिठा पावरा, डॉ.स्माइली थोटे, डॉ. पराग वसावे, आरोग्यमित्र सचिन धुमाळ, पालपेणे उपकेंद्राच्या आशा सेविका विभूती पालकर, हर्षदा सैतावडेकर तसेच ग्रामसभा मुंबई मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या आरोग्य शिबिरामध्ये साई निधी डायनॉस्टिक सेंटर मुंबईचे संदीप खैर यांनी नागरिकांची रक्तगट तपासणी केली. उपकेंद्र पालपेणे येथील कर्मचार्‍यांनी रक्त तपासणी तसेच नागरिकांना आरोग्य विषयक माहिती दिली. बी के एल वालावलकर हॉस्पिटल डेरवण येथील डॉक्टरानी आरोग्य तपासणी केली. तसेच पालपेणे (कुंभारवाडी) येथील श्री हनुमान प्रासादिक विकास मंडळ ग्रामस्थ व मुंबई आयोजित संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम व बी.के.एल. वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर पार पडले. आणि ग्रामस्व मुंबईकर यांनी रक्तदान केले. या आरोग्य तपासणी शिबिराचा शेकडो जणांनी लाभ घेतला. ग्रामस्थ व मुंबईकर मंडळाच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, भाजपचे ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांचा भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला. अनेक कार्यकर्ते व नागरिक तसेच महिलांनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ पालपेणे, ग्रामस्थ व मुंबईकर यांनी सहकार्य केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg