loader
Breaking News
Breaking News
Foto

वकिल अमोल कविटकर यांची नोटरी पब्लिक म्हणून नियुक्ती

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सह्याद्रीच्या कुशीतील निसर्गरम्य अशा सांगेली गावातील, त्या गावाचे आरध्य दैवत श्री गिरिजानाथ याच्या पावन भूमीतील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली सुमारे २० वर्षाहून अधिक काळ दिवाणी. फौजदारी आणि महसुली कायदेविषयक प्रकरणे सचोटीने हातळणारे वकील म्हणून परिसरात ख्याती असलेले वकील श्री अमोल कविटकर यांची अलीकडे भारत सरकार मार्फत नोटरी पब्लिक म्हणुन नियुक्ती झालेली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कविटकर यांनी विज्ञान शाखेची पदवी संपादन केल्यानंतर, विधी शाखेची पदवी मिळवून बिझनेस लॉ या विभागाची पदव्युत्तर अभ्यासक्रमात विशेष प्राविण्य देखील संपादन केलेले आहे, त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिथयश वकील आणि नोटरी दिवंगत सुभाष देसाई यांचेकडून व्यावसायिक मार्गदर्शन घेऊन आपला व्यवसाय त्यांनी नोटरी म्हणून आपले काम सांगेली आणि सालईवाडा पंचायत समिति कार्यालयासमोरील भोसले कॉम्प्लेक्स मधून सुरू केला, तसेच त्या व्यतिरिक्त त्यांनी परीसरातील सहयाद्री फाऊंडेशन चे अध्यक्षपद भूषवून त्यासह अनेक सामाजिक संस्था मध्ये कार्य केले असून, बऱ्याच सामाजिक तथा इतर लोकोपयोगी कार्यात देखील आपले योगदान दिलेले आहे त्यांनी आपल्या या यशाचे श्रेय सैनिक नागरी सहकारी पतसंस्था विद्यमान चेअरमन श्री बाबुराव कविटकर, तसेच आई, मामा आणि सांगेली गावाचे आरध्य दैवत श्री गिरिजानाथ, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकील परिवार आणि मित्र मंडळी यांना दिले आहे. त्यांचे या यशा बद्दल सर्व हितचिंतक, सांगेली तथा सावंतवाडी मधील नागरिक यांचेकडून अभिनंदन करणेत येत आहे त्यांनी नोटरी म्हणून उतमोत्तम सेवा देणेचे सांगून सर्वांचे आभार मानले आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg