सावंतवाडी (प्रतिनिधी) : फणसवडे गाव हे गुन्हे मुक्त व व्यसन मुक्त असल्याचा आपणास अभिमान आहे. या गावाचा आदर्श सर्वच गावांनी घ्यावा असे आवाहन पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी जिल्हावासीयांना केले आहे. गावातील एकोपा व शांतता कायमस्वरुपी अबाधित ठेवण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. आपल्या गावाची भौगोलिक परिस्थिती पाहता आपल्याकडे जे आहे ते दुसर्या कोणाकडेच नाही या समाधानाने सर्व गाव एकत्रित नांदतो याचा आनंद होत आहे. ज्येष्ठ नागरिक, अंमली पदार्थ, महिला सुरक्षा, डायल 112 हेल्पलाईन इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, यांच्या संकल्पनेतून पोलीसांचा दुर्गम गावांमधील नागरिकांशी सतत संपर्क व सुसंवाद राहून नागरिकांसाठी शंभर योगदान रहावे या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्यावतीने ग्रामसंवाद उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर फणसवडे गावात गुरूवारी भेट दिली. ते म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांसाठी सिंधुदुर्ग पोलिसांची हेल्पलाईन नं. 7036606060 चे लोकार्पण करण्यात आले व तेव्हापासून ज्येष्ठ नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद या हेल्पलाईनवर सुरु असून त्यांच्या पोलीस विभागाशी व अन्य प्रशासकीय विभागांशी संबंधित वेगवेगळ्या समस्यांचे वेळेत निराकरण करण्यात येत आहे.
Aसावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री घाटाच्या पायथ्याशी असलेल्या फणसवडे या दुर्गम गावांमध्ये भेट देवून ग्रामस्थांशी थेट सुसंवाद साधला. गावातील शिक्षक भास्कर गावडे यांनी गावाची ओळख करुन देताना या गावात फणसाची खूप जास्त प्रमाणात लागवड असल्याने गावाचे नाव फणसवडे असे आहे असे सांगून आमचे गाव हे संपूर्णपणे गुन्हेमुक्त असून आजपर्यंत कोणताही गुन्हा अथवा कायदा व सुव्यवस्था याकरीता पोलिसांना इथपर्यंत यावे लागलेले नाही. तसेच अभिमानाने सांगतो की, आमच्या गावावर संस्कृतीचा पगडा असून गावात कोणीही व्यसन करीत नाही, संपूर्ण गाव हे व्यसनमुक्त गाव असल्याचे सांगितले. गावातील सर्व लोक आहे त्या परिस्थितीत समाधानी असून कोणत्याही वाईट प्रवृत्तीला बळी पडत नाहीत. गावातील किरकोळ स्वरुपाच्या समस्या हया ग्रामदेवतेच्या समोर बसून सोडविण्याची प्रथा आहे. सर्व सण उत्सव रुढी परंपरेप्रमाणे एकोप्याने व शांततेत साजरे केले जातात असे सांगितले. माजी पंचायत समिती सदस्य संदिप गावडे यांनी स्वागत केले. ते म्हणाले, शालेय मुलांवर पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीचा व मार्गदर्शनाचा निश्चितच सकारात्मक प्रभाव पडून यातील काही मुले आयएएस, आयपीएस अधिकारी बनतील आणि या कार्यक्रमाचा हेतु सफल होईल. त्यांनी गावातील शासकीय वनसंज्ञा, सामाईक क्षेत्रातील जमिनींचे प्रश्न व जमीन सुधारणा, माकड, गवे रेडे यांचा होणारा त्रास इत्यादींवर प्रशासनाने योग्य तो मार्ग काढून नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली. तसेच फणसवडे हे गाव सावंतवाडी तालुक्यातील गाव असून ते बांदा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये पूर्वीपासून आहे.
परंतु, गावातील सर्व लोकांचे सर्व प्रकारचे व्यवहार हे सावंतवाडी मध्ये आहेत. त्यामुळे सोयीच्या दृष्टीने सदर गाव बांदा पोलिस ठाण्याच्या ऐवजी सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये घेण्यात यावे याबाबत सर्व उपस्थित ग्रामस्थांनी एकत्रित निवेदन तयार करुन पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांना दिलेले आहे. सदर निवेदनावर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी कमीत कमी वेळेत यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे नागरिकांना आश्वासित केलेले आहे. उपस्थित महिला भगिनी श्रीमती रवीना गावडे, श्रीमती सविता गावडे यांनी त्यांचे मनोगतामध्ये आम्ही गावात लग्न झाल्यापासून सुखी समाधानाने नांदत आहोत, गावातील नागरिक व्यसन करत नसल्याने केव्हाही माहेरी किंवा पोलीसांकडे जाण्याची वेळ आजपर्यंत आलेली नाही, असे सांगितले. सदर कार्यक्रमास गावच्या सरंपच श्रीमती स्नेहल कासले, गावातील ज्येष्ठ नागरिक मान्यवर रघु गावडे, सेवानिवृत्त पोलीस अंमलदार आप्पा गावडे इत्यांदीसह सुमारे शंभर महिला, पुरुष, विद्यार्थी व पत्रकार उपस्थित होते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.