loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलच्या कु. ईश्वरी व कु. वीर यांनी पटकावला ’बालवैज्ञानिक’ पुरस्कार

खेड (प्रतिनिधी) : रविवार दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन, मुंबई मार्फत झालेल्या होमीभाभा बालवैज्ञानिक तृतीय पातळीवरील परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये रोटरी स्कूलच्या इयत्ता सहावीतील कु. ईश्वरी माळी हिने रौप्य पदक व कु. वीर कालेकर याने कांस्य पदक पटकावून ’बालवैज्ञानिक’ होण्याचा बहुमान मिळविला. होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षेकरिता शाळेतील तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कु. ईश्वरी माळी हिने ’सस्टेनेबल लॅन्डस्कीपींग यात रेसिडेन्सीयल गार्डनिंग या कृती संशोधन विषयाची निवड केली. कु. वीर कालेकर याने ’’सस्टेनेबल लॅन्डस्कीपींग ’ यात रेसिडेन्सीयन गार्डनर्स युनिट या कृती संशोधन विषयाची निवड केली. या कृतिसंशोधनांमध्ये घराच्या आजुबाजूला असलेल्या मोकळ्या जागेत एक महिन्याच्या कालावधीत फळझाडे व औषधी वनस्पतीची लागवड केली. झाडांचा पालापाचोळा, फळांच्या साली, ओला कचरा यांपासून कंपोस्ट खत तयार केले. जैवविविधता संवर्धन करण्यावर भर देऊन पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व खाण्याची सोय केली. त्यासाठी छोटे छोटे खड्डे तयार करून त्यात पाणी ठेवले. त्यामुळे पशुपक्ष्यांचे जीवन समृद्ध होण्यास मदत झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

होमीभाभा बालवैज्ञानिक ही परीक्षा चार पातळींवर घेतली जाते. त्यामध्ये प्रथम पातळी - लेखी परीक्षा, द्वितीय पातळी- प्रात्यक्षिक परीक्षा, अंतिम पातळी - कृतिसंशोधन व मुलाखत अशाप्रकारे या परीक्षेचे स्वरूप असते. वरील सर्व यशस्वी बालवैज्ञानिकांना मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशनतर्फे यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे पदक, रोख रक्कम व बालवैज्ञानिक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वरील यशस्वी विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिक्षिका सौ. रिया पवार, सौ. तेजश्री क्षीरसागर, राहुल चव्हाण, प्रयोगशाळा सहाय्यक प्राजक्ता गावडे, ग्रंथपाल सौ. सिध्दी दामले व सर्व विज्ञान विषय शिक्षक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी बालवैज्ञानिकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg