दापोली (शशिकांत राऊत) : सर्वांमुखी जगदंबेचा उदो उदो...., भले गो भाई अशा प्रकारचा जयघोष करत केळशी येथील श्री. महालक्ष्मीच्या रथोत्सवाची मिरवणूक परंपरेनुसार शनिवारी हनुमान जयंतीच्या दिवशी काढण्यात आली. या रथोत्सव मिरवणुकिला भाविक भक्तगणांचा मिळालेला उदंड प्रतिसाद हा क्षणाक्षणाला भक्तगणांच्या उत्साहाची रंगत वाढविणारा असाच होता.
दापोली तालुक्यातील केळशी येथे श्री. महालक्ष्मीचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. या श्री. महालक्ष्मी मंदिरातील महालक्ष्मीचा वर्षभरात हनुमान जयंतीला सर्वात मोठा उत्सव होतो. या उत्सवाला केळशी आणि केळशी परिसरातील नोकरी, धंदा, शिक्षणासाठी कुणी आपल्या गावापासून कुठेही दुर अंतरावरील शहरात राहत असले तरी ते हमखास या उत्सवाला आपली हजेरी लावतात. एवढी अपरंपार भक्तीची श्रध्दा येथील लोकांची श्री. महालक्ष्मी देवीवर आहे. अशा या सर्व दुर ख्याती पावलेल्या श्री महालक्ष्मी देवीचा उत्सव म्हणजेच शिस्तबद्ध जाती निरपेक्ष आदर्श समाज रचनेचा उत्कृष्ट आदर्शाचा उत्तम नमुना आहे. हा आपल्याला इतर कोणत्याच ठिकाणी पाहायला मिळणार नाही. या उत्सवात सर्व जाती जमातीच्या लोकांना जशी फुले एका माळेत फुंफली जातात तसे गुंफले गेले आहे. हे या केळशी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या रथोत्सवाचे खरे वैशिष्ट्य आहे.
उत्सवासाठी मांडव घालून झाल्यावर मंडपात करण्यात येणारी सजावट ही भव्यदिव्य नसून शांत, चित्त प्रसन्न करणारी अशी असते. चारही बाजूला उतरती छते, त्यावर लटकणारी हंड्या, झुंबरे, त्याखाली देवदेवतांच्या तसबिरी, त्याखाली चिराकदान (चिराकदान म्हणजे पणत्या ठेवण्यासाठी बांधलेले आडवे लाकूड वा पोफळ इ.), त्याखाली अर्धे उरणारे खांब हे पानाफुलांनी नटवलेले असतात. श्री महालक्ष्मी मंदिरात वीज जोडणी देण्यात आलेली असली तरी विजेचा उपयोग अन्य देवळात, गाभार्यात, कळसावरील मर्क्युरी दिवा लावण्यासाठी फक्त केला जातो. सभामंडपात मात्र विजेला पूर्ण मज्जाव करण्यात आला आहे आणि त्यामुळेच हंड्या लागल्यावर, आजूबाजूला समया, मोठे लामण दिवे तसेच सभोवताली पणत्या लावल्यावर मंद तेलाच्या प्रकाशातील पावित्र्य आणि सुंदरता मनावर एक वेगळीच मोहिनी घालून जाते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.