loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी तालुक्यातील शिवसेना नेते सचिव तथा खासदार विनायक राऊत यांच्याहस्ते नवनिर्वाचित नियुक्त्या जाहीर...

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार तथा शिवसेना नेते, सचिव विनायक राऊत आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी रत्नागिरी तालुक्यातील नविन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन संघटना मजबूत करण्यासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये पावस व गोळप जिल्हा परिषद गटाच्या उपतालुकाप्रमुख पदी सुभाष रघुनाथ पावसकर, हातखंबा व करबुडे जिल्हा परिषद गटाच्या उपतालुकाप्रमुखपदी सुभाष पुंडलिक रहाटे, करबुडे जिल्हा परिषद गटाच्या विभागप्रमुखपदी चंद्रकांत काशिराम साळवी, कर्ला पंचायत समिती गणाच्या उपविभागप्रमुखपदी मिलींद प्रभाकर हातफले यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. तसेच रत्नागिरी शहरातील सलिल सुरेश डाफळे यांची उपशहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम, रत्नागिरी जिल्हा समन्वयक रविंद्र डोळस, सहदेव बेटकर, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, शिवसहकार सेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना विस्तारक प्रद्युम्न माने, शहर संघटक व युवासेना तालुकाधिकारी प्रसाद सावंत, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, महेंद्र चव्हाण, विभागप्रमुख किरण तोडणकर, मयुरेश्वर पाटील, उत्तम मोरे, संतोष हळदणकर, संदेश भिसे, बिपीन शिवलकर, विभागप्रमुख साजीद पावसकर, शकील मालदार, अमित खडसोडे, विभागसंघटक प्रविण साळवी, ज्येष्ठ शिवसैनिक शरद राणे, उपशहर संघटक सौ.सेजल बोराटे, विभाग संघटक श्रीम पूजा जाधव व इतर सर्व उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg