loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वतःमध्ये कौशल्य हस्तगत करून स्वतःला सिध्द करणे आवश्यक - नवनिर्माण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये

संगमेश्वर (प्रतिनिधी) : पदवी घेत असताना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची तयारी करणे आवश्यक आहे. आर्टिफिशियल एजन्सी ऍडॉप्ट करून वापरण्याचे कौशल्य संपादन करा असे प्रतिपादन अभिजित हेगशेट्ये यांनी केले. नवनिर्माण महाविद्यालयात आयोजित पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सेक्रेटरी आणि आर्किटेक परेश पाडगावकर, प्राचार्य संजना चव्हाण, प्राचार्या प्रज्ञा कदम आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये म्हणाले की अस्तित्वाची भीती वाटत असल्याने पदवी झालेला विद्यार्थी मुंबईकडे नोकरीसाठी जात आहे. आयुष्यात रिस्क घेण्याची तयारी असली पाहिजे. पदवी पूर्ण झाल्यानंतर मला काही गोष्टी जमत नाहीत म्हणून निराश होण्याची गरज नसते तर मी काय करू शकतो यासाठी नवीन कल्पना निर्माण करून स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे. पदवी घेऊन बाहेर पडत असताना पदवीचे ज्ञान घेऊन मी बाहेर पडलो का याचा विचार करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. पदवीदान समारंभाला नवनिर्माण महाविद्यालयातील कला, वाणिज्य आणि सायन्स विद्यार्थ्यांना परेश पाडगावकर, चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांच्याहस्ते पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष खरे आणि आभार अनिल नेमन यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg