loader
Breaking News
Breaking News
Foto

सुकिवली रेल्वे पुलाच्या दोन्ही बाजूला गतिरोधक टाका ; शरद पवार खेड राष्ट्रवादीची सा. बां. खात्याकडे मागणी!!

खेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील सुकीवली - आंबवली मुख्य रस्त्याला लागून असलेल्या कोकण रेल्वे मार्गावरील सुकीवली रेल्वे पुलाच्या दोन्ही बाजूला गतिरोधक टाकण्याची मागणी येथील खेड तालुका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनायक वामन निकम आणि सहकार्‍यांनी तक्रारवजा लेखी निवेदनाद्वारे खेड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता श्रीमती आशा जटाळ यांच्याकडे नुकतीच दि. 11 एप्रिल रोजी केली आहे. या मागणीची 30 एप्रिलपर्यंत दखल घेण्यात आली नाही, तर 1 मे या महाराष्ट्र व कामगारदिनी उपोषण छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेली अनेक वर्षे सुकिवली ग्रामपंचायतीचा ठराव व पत्र देऊनसुद्धा आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही. गेली अनेक वर्ष अपघाताचे प्रमाण वाढत असून जीवितहानीचे प्रकार वाढत आहेत. तसेच आर्थिक हानी आणि मुक्या जनावरांचे अपघातामुळे नाहक बळी जात आहेत. आपल्या विभागाकडून या मागणीकडे दुर्लक्ष होत असून हि बाब अतिशय गंभीर आहे. तरी आपणाकडून सुकिवली रेल्वे पुलाच्या दोन्ही बाजूने गतिरोधक टाकण्यात यावेत, जर दिनांक 30/04/2025 पर्यंत रस्त्याला गतिरोधक बसविले नाहीत तर खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दिनांक 01/05/2025 कामगारदिनी दिवशी उपोषण छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशारा देण्यात आला आला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg