संगमेश्वर / प्रतिनिधी संगमेश्वर तालुक्यातील मासरंग या ठिकाणी वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या हेतूने फिरणाऱ्या आठ जणांना सिंगल बॅलर बंदूक,जिवंत काडतूस व इतर मुद्देमाल व चारचाकी वाहन सहित संगमेश्वर पोलिसांनी ताब्यात घेण्याची धडाकेबाज कामगिरी केली असून ही कामगिरी मासरंग -शेनवडे रस्त्यावर 12 एप्रिल रोजी 2 वाजता करण्यात आली.वन्य प्राण्यांची शिकार करणारेच पोलिसांच्या सापळ्यात सापडल्याने तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
संगमेश्वर पोलिसांच्या प्राप्त माहिती नुसार तालुक्यातील मासरंग -शेनवडे रस्त्यावर MH 08/ई/0950 असे नंबर असलेल्या महिंद्रा पिकअप बोलेरो चारचाकी वाहनातून दशरथ दिलिप बारगोडे वय 39 राहणार पोमेंडी बुद्रुक, कारवांचीवाडी,जि. रत्नागिरी विजय भिकाजीं पाछकुडे वय 42 राहणार शेनवडे ता. संगमेश्वर,सुभाष दाजी बोबळे वय 50 राहणार शेनवडे, चिलेवाडी ता. संगमेश्वर,गणेश गंगाराम लाखन वय 32 राहणार शेनवडे, खालचीवाडी ता. संगमेश्वर,सत्यवान सिताराम जोगळे वय 38 राहणार शेनवडे ता. संगमेश्वर,रमेश सिताराम लाखन वय 43 वय राहणार शेनवडे खालचीवाडी ता. संगमेश्वर,सुरेश मोळू जोगळे वय 38 राहणार शेनवडे जोगळेवाडी ता. संगमेश्वर,दिलिप रामचंद्र बारगोडे पोमेंडी बुद्रुक कारवांचीवाडी हे आठजन वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने दिलिप रामचंद्र बारगोडे यांच्या नावे शेती सरक्षण परवाना असलेली सिंगल बॅलर बंदूक काडतूस बंदूक, शक्तिमान 12 एक्सप्रेस नं दीडशे रुपये किमतीचा एक काडतूस,शक्तिमान 12 एक्सप्रेस 4.8 सहाशे रुपये किमतीचे चार काडतूस आणि विजेऱ्या सहा बॅटऱ्या स्वतःजवळ बाळगून वावरताना आढळून आल्याने संगमेश्वर पोलिसांनी वापरण्यात आलेली पिकअप बोलेरो, बंदूक असा एकूण 2,57,250 रुपयांच्या मुद्देमाला सहित या आठजणांना ताब्यात घेतले आहे.
टाइम्स स्पेशल
12 एप्रिल रोजी रात्री 2 वाजताच्या दरम्याने मासरंग-शेनवडे या ठिकाणी शिकारी करणाऱ्यांना संगमेश्वर पोलिसांनी सापळ्यात अडकवून त्यांच्यावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. 65/2025,शस्त्र अधिनियम 1959 चे कलम, 3/25,30 भारतीय न्याय संहिता कलम 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधिक्षक शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, सचिन कामेरकर, सोमनाथ आव्हाड सिद्धेश आंब्रे होमगार्ड मोहिते यांनी कामगिरी केली
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.