कोकणात समुद्र किनारपट्टीवर दुपारनंतर ढगांचे आच्छादन होत असून मावळतीला आणि सूर्योदयाला ढगांचे आच्छादन स्पष्टपणे दिसत आहे त्यामुळे कोकणात पावसाला पोषक वातावरण असल्याचे स्थानिक शेतकरी वर्गातून सांगितले जात आहे. हवामान खात्याच्या अंदाज अपेक्षा शेतकरी आभाळाकडे पाहूनच पावसाचा अंदाज बांधतात. यंदा काही भागात जोरदार पाऊस झाला पण किनारपट्टीवर मात्र पावसाने पाठ फिरवल्याने आंबा बागायतदारांचे होणारे मोठे नुकसान टळले आहे. आता हंगाम जोरात सुरू असताना पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ग्रामीण भागात रात्रीचे पाखरे वीज पेटली की येऊ लागली तर पावसाचा अंदाज बांधला जातो. तसेच ज्या विहिरींना पाणी कमी झाले आहे त्यात बेडूक मोठ्या प्रमाणात आवाज करतात. रात्रीच्या वेळेला सुरू होणारा पाखरांचा किलबिलाट हे सुद्धा पावसाचे लक्षण समजले जाते.
: वामान विभागाने मराठवाड्यातील नांदेड बीड जालना लातूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा अनुमान वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र व कोकणातील सिंधू रायगड ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग ,रत्नागिर जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी ही पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोकणात पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे. वातावरणामध्ये कमालीचा उष्मा वाढला आहे. येथे चार ते पाच दिवसात कोकणात पाऊस पडेल असा अंदाज परतवण्यात येत आहे. कोकणात पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे.
टाइम्स स्पेशल
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.