loader
Breaking News
Breaking News
Foto

मांडवा दुर्घटनेनंतर निलंबित झाला अजिंठा कॅटामरनचा परवाना; तपासासाठी 3 सदस्यीय चौकशी समिती स्थापन

यगड (Raigad) जिल्ह्यातील अलिबागजवळ (Alibaug) अजिंठा कंपनीच्या (Ajanta Company) कॅटामरन प्रवासी बोटीशी संबंधित अलिकडच्या घटनेनंतर, बोट कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला आहे. रायगडच्या जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी (डीआयओ) जारी केलेल्या निवेदनात याबाबत माहिती देण्यात अली आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने तीन सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे, जी या दुर्घटनेची सविस्तर चौकशी करेल आणि तीन दिवसांत राज्य सरकारला अहवाल सादर करेल. महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बुधवारी संध्याकाळी 130 प्रवाशांना घेऊन जाणारी ही बोट गेटवे ऑफ इंडियाहून मांडवाकडे जात असताना, मांडवा जेट्टीपासून सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर समुद्राचे पाणी जहाजात शिरू लागले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आणि त्यांनी तात्काळ मदतीसाठी हाक मारली. जवळच्या बोटींनी तातडीने मदतीचा हात पुढे केला आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बोटीमधून बाहरे काढले. त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. यावेळी कोणतीही दुखापत झाली नसली तरी, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी परिस्थिती गंभीर धोका निर्माण करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg