loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहरात विकास आराखडा तयार करताना अगोदर लोकांच्या शंकांचे निरसन करा आणि मगच मंजूरी घ्या, नागरिकांची मागणी

लांजा (संजय साळवी) - लोकांना कोणत्याही प्रकारची माहिती न देताच लांजा शहर विकास आराखडा (डिपी प्लॅन) बळजबरीने नागरिकांवर लादण्याचा प्रयत्न नगरपंचायत प्रशासनाने करू नये. आधी लोकांच्या शंकांचे निरसन करा आणि मगच विकास आराखडा मंजूर करा अशी आग्रही मागणी लांजा शहरातील नागरिकांच्यावतीने नगरपंचायत प्रशासनाकडे करण्यात आली आहे. लांजा नगरपंचायत प्रशासनाकडून नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांना कोणतीही माहिती न देताच शहराचा प्रारूप विकास योजना आराखडा (डीपी प्लॅन) जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या भूमिकेवर लांजा शहर परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नगरपंचायत प्रशासनाला निवेदन सादर केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या निवेदनात म्हटले आहे की, लांजा नगरपंचायत प्रशासनाने लांजा शहराचा प्रारूप विकास योजना आराखडा जाहीर केला आहे. लांजा नगरपंचायत इमारतीच्या दर्शनी बाजूस नागरिकांना हरकती घेण्यासाठी तो सादर केलेला आहे. मात्र या शहर विकास आराखड्याबाबत नगरपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना किंवा भूधारक शेतकरी यांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. हे सर्वजण या विकास आराखड्याबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे एक प्रकारे हा डीपी प्लॅन बळजबरीने पूर्ण करण्याचा किंवा तो नागरिकांवर लादण्याचा हेतू नगरपंचायत प्रशासनाचा असल्याचे दिसून येत आहे. लांजाचा विचार केला तर लांजा नगरपंचायतीचा संपूर्ण भाग हा वाडी-वस्ती, शेती, व्यवसाय यात विभागला गेलेला आहे. सादर करण्यात आलेला आराखडा पाहता नागरिकांचे वैयक्तिक तसेच शेतीबाबत, घरांबाबत आणि व्यवसायांबाबत मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची चिन्हे आहेत. नागरिकांना कोणतीही पूर्व सूचना न देता चुकीच्या पद्धतीने आराखडा तयार करण्यात आला आहे. वास्तविक या विकास आराखड्याबाबत घंटागाडीच्या माध्यमातून लोकांना माहिती देवून नागरिकांची सभा घेण्यात यावी आणि या ठिकाणी नागरिकांना संपूर्ण माहिती देण्याची आवश्यकता आहे. मात्र तशी खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, नगरपंचायत प्रशासनाने तयार केलेल्या या शहर विकास आराखड्याला आमचा विरोध असून आधी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करा आणि त्यानंतरच विकास आराखडा मंजूर करा. अन्यथा हा आराखडा मंजूर करण्यात येवू नये अशी मागणी शहरातील नागरिक मोहन तोडकरी, मंगेश मुळ्ये, सचिन लिंगायत, रवींद्र लिंगायत, नितीन शेट्ये, सूर्यकांत लांजेकर, चंद्रशेखर धावणे, सुरेश कांबळे, सहदेव लांजेकर, परवेश घारे, प्रकाश शिगम, राजेश लांजेकर, रमेश मांडवकर, प्रकाश पाध्ये, अंकुश सावंत आदींसह अन्य नागरिकांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg