लांजा (वार्ताहर) - युवा संदेश प्रतिष्ठान सांगवे कणकवली आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर झाला असून जिल्हा परिषद शाळा लांजा नं. ५ च्या इयत्ता दुसरीतील कु. विश्वजा वसंत जाधव हिने जिल्ह्यात प्रथम तर कु. अविराज महादेव बंडगर याने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर इयत्ता ७ वीमध्ये न्यू इंग्लिश स्कुल लांजा या प्रशालेच्या कु.भक्ती दत्तराम गोरे हिचा जिल्ह्यात पाचवा क्रमांक आला आहे.
लांजा तालुक्यातील इयत्ता निहाय प्रथम पाच गुणानुक्रम विद्यार्थी पुढीलप्रमाणे:- इयत्ता २ री - प्रथम - कु. वैष्णवी विजय मणचेकर शाळा लांजा बागेश्री, द्वितीय - कु. आर्या संतोष खाडे शाळा रुण शाळा नं. २ सडवली, तृतीय - कु. प्रतिक्षा गणेश मांडवकर शाळा रुण नं. २ सडवली, चतुर्थ - कु. श्रेया तुळशीराम मदने शाळा लांजा बागेश्री, पाचवा - कु. कुंदन यशवंत धुर्ये शाळा शिरवली. इयत्ता ३ री - प्रथम - कु. आरुष दिलीप चव्हाण शाळा लांजा नं.५, द्वितीय - कु. प्रचिती सागर पेणकर शाळा लांजा नं. ५, तृतीय - कु. कैवल्य संजय कोतापकर शाळा लांजा नं. ५, चतुर्थ - कु. प्रथमेश शिवाजी बांगर शाळा वेरवली बुद्रुक, पाचवा - कु. अद्वैत मनिष यादव शाळा वेरवली बुद्रुक इयत्ता ४ थी - प्रथम - कु. यशस्वी महेंद्र लिंगायत शाळा लांजा नं. १, द्वितीय - कु. आदित्य संतोष पेडणेकर शाळा लांजा नं. ५, तृतीय कु. चैतन्या रमेश कांबळे शाळा लांजा नं. १, चतुर्थ - कु. आराध्या राजेंद्र निमकर्डे शाळा लांजा नं.१, पाचवा - कु. साहिर शाकीर जेठी शाळा लांजा नं.१ इयत्ता ६ वी - प्रथम - कु. दूर्वा गजानन विभुते शाळा न्यू इंग्लिश स्कुल लांजा, द्वितीय - कु. महेश हार्दिक कुरूप शाळा न्यू इंग्लिश स्कुल लांजा, तृतीय - कु. स्वरा भालचंद्र बोडस शाळा न्यू इंग्लिश स्कुल लांजा, चतुर्थ - कु. श्लोक स्वप्निल चव्हाण न्यू इंग्लिश स्कुल लांजा, पाचवा - कु. रुद्र रमाकांत दैत न्यू इंग्लिश स्कुल लांजा इयत्ता ७ वी - प्रथम - कु. गार्गी दिनेश झोरे, शाळा न्यू इंग्लिश स्कुल लांजा, द्वितीय - कु. तन्मय जयवंत ताम्हणकर शाळा शिरवली, तृतीय - कु. नुपूर अतुल पत्की न्यू इंग्लिश स्कुल लांजा, चतुर्थ - कु. प्रज्वली सुनील खांडेकर न्यू इंग्लिश स्कुल लांजा, पाचवा - प्रसाद परशुराम करंबेळे, शाळा लांजा नं. १.
दरम्यान, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना रोख बक्षीसे, सन्मानपत्रे, मेडल्स देवून जिल्हास्तरीय सत्कार समारंभात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे युवा संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश सावंत, परीक्षा प्रमुख सुशांत मर्गज, जिल्हा समन्वयक श्रीधर दळवी, केंद्र संचालक उमेश केसरकर यांनी अभिनंदन केले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.