loader
Breaking News
Breaking News
Foto

एम.आय.बी गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये सेमिनार संपन्न ---

संगलट(खेड)(इक्बाल जमादार)- खेडशहरातील बज्म-ए-इमदादीयाच्या एम.आय.बी.गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये रविवार दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता ए.ई.कालसेकर कॅम्पस खेड येथे ’ऊर्दू भाषा आणि भारतीय संस्कृती’ यावर सेमिनार यशस्वीरित्या संपन्न झाला. त्यासाठी प्राध्यापक दानीश गणी यांनी अध्यक्षस्थान भूषविले होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. शमीम तारीक तर अन्य पाहुण्यांमध्ये रियाज अहमद खान, रफीक वस्ता व आझाद चौगले सरांचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात सिदरा जावेद आजरेकरच्या कुराण पठणाने करण्यात आली. जैनब जोगीलकर एण्ड ग्रुपने दुआचे गायन केले. झियाऊर रहमान खान यांनी पाहुण्यांचा परिचय करून देताना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचे स्वागत केले. मेहबुबी दुदुके एण्ड ग्रुपने स्वागत व शाळा गीतांचे सुरेख गायन केले. मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. यावेळी प्रशालेतील इस्त्रो प्रोजेक्टसाठी निवड झालेल्या सिध्दी बहुतुले तसेच वैभवी व समृद्धी, रोशनी भोसले, पूर्वा सनगरे, गौरी मोहिते व साध्वी शिगवण तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांना गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रियाज अहमद खान यांनी आपल्या भाषणात मानव सेवा हीच ईश्वरसेवा असल्याचे सांगताना आपल्या मुलींच्या यशात एम.आय.बी शाळेचा सिंहाचा वाटा असल्याचे नमूद केले. रफीक वस्ता यांनी संस्थेच्या कार्याची दखल घेताना शैक्षणिक प्रगतीबद्दल सर्वांची प्रशंसा केली. शमीम तारीक यांनी ऊर्दू भाषेच्या इतिहासाची माहिती देताना राष्ट्रीय एकात्मतेचे खरे प्रतीक असलेल्या या शाळांची प्रशंसा करताना भविष्यकालीन प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात दानीश गणी यांंनी कोकणात ऊर्दू भाषेच्या प्रगतीसाठी संस्थेचे खास कौतुक करताना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन नाझीमा महाते व निलोफर काझी यांनी केले तर जैबा खतीब यांनी आभार मानले. यशस्वी आयोजनासाठी माननीय संस्थाध्यक्ष ए.आर.डी खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg