loader
Breaking News
Breaking News
Foto

समाजाचे देणे लागतो या भावनेतून आरोग्य शिबिर- परशुराम उपरकर ---

कणकवली (प्रतिनिधी)- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तेली आळी येथील भवानी सभागृहात मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले. परशुराम उपरकर मित्र मंडळ आणि शिवसेना कणकवली यांच्या वतीने आयोजित केलेल्या या मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी २०० जणांना चष्मे वाटप करण्यात आले. तर नेत्र तपासणी शिबिरामध्ये १० जणांना मोतीबिंदू असल्याचे तपासणीत आढळून आले. या १० जणांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन मुंबई येथे मोफत केले जाणार आहे. कणकवली तालुक्यातून आलेल्या लाभार्थ्यांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला. आणि समाधान व्यक्त केले. यावेळी २०० लाभार्थ्यांना ७० रुपयांमध्ये चष्मे वाटप करण्यात आले. माजी आम. वैभव नाईक आणि शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतिश सावंत यांनी शिबिराच्या ठिकाणी भेट दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी चंद्रशेखर उपरकर, मंगेश लोके, राजू शेट्टी, भालचंद्र दळवी, राजू कोरगावकर, निलेश चव्हाण, अजित काणेकर,संतोष सावंत, समीर परब , अभि तेंडुलकर, संजय बेलवलकर, अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह करमार सिंह हॉस्पिटल मुंबई अंधेरी पश्चिम, एमजेएफ लायन डॉ. आर. जी. राव, डॉ. नीलम बांदिवडेकर, डॉ. मिलन जगदीश राव, डॉ. सैफ मोहम्मद, डॉ. दानिश आदी उपस्थित होते. यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्य म्हणून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य शिबिरे आणि मोफत नेत्र तपासणी शिबिरे घेऊन ७० रुपयांमध्ये चष्मे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासत आहोत. गोर गरीब लोकांना महागाईची झळ बसत आहे. त्यामुळे सध्याच्या महागाईत ७० रुपयांत चष्मा वाटप केले आहे. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासत श्री . परशुराम उपरकर मित्र मंडळ आणि शिवसेना कणकवली यांच्या वतीने तसेच गाबित समाज देवगडच्या वतीने जिल्हाभरात आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg