loader
Breaking News
Breaking News
Foto

तिलारी घाटात टेम्पो पलटी ---

दोडामार्ग(प्रतिनिधी)- तिलारी घाट हा अवजड वाहनांना धोकादायक आहे. नेहमी ये जा करणार्‍या वाहन धारकांना घाटातील धोकादायक चढ उतार याची माहिती आहे. पण पहिल्यांदा मालवाहतूक वाहने घेऊन येतात त्यांचा अंदाज चुकला की अपघात होण्याची शक्यताच. रविवारी घाटमाथ्यावरील एक टेम्पो मोठ्या प्रमाणात कांदा तसेच इतर सामान घेऊन गोवा या ठिकाणी जाण्यासाठी घाट उतरून खाली येत असताना धोकादायक अपघातग्रस्त वळणावर जयकर पॉईंट येथे टेम्पो पलटी होऊन नुकसान झाले. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही. टेम्पो मधिल चालक व इतरांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. पण वाहनांचे नुकसान झाले. पण टेम्पो पलटी झाल्याने इतर वाहनांना थोडा अडथळा निर्माण झाला. तिलारी घाटातील अवजड वाहने यावर चंदगड पोलीस, बांधकाम विभाग यांचे लक्ष नाही का? यामुळे मोठी वाहने पुन्हा सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात एक कंटेनर अडकून सात वाहतूक बंद झाली होती. जयकर पॉईंट येथे या अगोदर देखील अपघात होऊन संरक्षण कठडे तोडून टाकले आहेत. पावसाळ्यात या ठिकाणी उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे. अपघातग्रस्त टेम्पो बाजूला करण्यासाठी क्रेन बोलवण्यात आली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg