loader
Breaking News
Breaking News
Foto

आंध्र प्रदेशमधील अनकापल्ली जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; 4 कामगारांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमधील अनकापल्ली जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट (Andhra Pradesh Explosion) झाल्याची घटना घडली. वृत्तसंस्था एएनआयनुसार, स्फोटात चार कामगारांचा मृत्यू झाला. स्फोट कसा झाला याचे कारण समोर आलेले नाही. स्फोटाच्या घटनेनंतर तेथे सुरक्षा उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. चार मृतांसह अनेक जण जखमी झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील कोटावुरुतला भागात असलेल्या फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला असून आठ कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. स्फोट इतका भयंकर होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटर अंतरावर ऐकू आला. पोलीस अधीक्षक तुहिन सिन्हा यांनी घटनेला दुजोरा दिला असून बचावकार्य सुरू असल्याचं सांगितलं.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. चंद्राबाबू नायडू यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि राज्याच्या गृहमंत्री अनिता यांच्याशी फोनवरून संपर्क करून घटनेचा आढावा घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा देण्याचे आणि शोकग्रस्त कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg