खेड:- तालुक्यातील आंबडस येथील ग्रीनव्हिला फार्महाऊसमधील १०५ नंबरच्या खोलीत एका बॅगेमध्ये ठेवलेले १ लाख ५ हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास करणाऱ्या एका महिलेसह दोघांना येथील पोलिसांनी शुक्रवारी रात्री गजाआड केले. दोघांच्या अटकेने अन्य दागिने चोरीप्रकरणाचा छडा लागण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनें येथील पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. सिद्धेश एकनाथ उतेकर (२७, मूळ गाव कुरवळ जावळी-आखाडवाडी), रचना राजेंद्र भोसले (३२, आंबडस -गवळवाडी, मूळ गाव चोरवणे-गडकरवाडी) अशी अटकेतील दोन्ही संशयितांची नावे आहेत. ही घटना ९ मार्च रोजी घडली होती.
संतोष रमेश शितोळे (४९, रा. लवले-पुणे) यांनी पोलीस -खेड पोलिसांची दागिने कारवाई, आंबडस तक्रार. येथून लाखाचे होती. ठाण्यात चोरीची नोंदवली भारतीय दागिने गेले होते सैन्यदलात सेवेत असणाऱ्या शितोळे संतोष यांचे आंबडस येथे ग्रीनव्हिला फार्महाऊस आहे. या फार्महाऊसमधील १०५ नंबरच्या खोलीच्या खिडकीची स्लायडींगची काच सरकवत त्याद्वारे आतमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला. बॅगेत ठेवलेले ५ ग्रॅम वजनाचे २ सोन्याचे कानातील एअरटॉप, ५ ग्रॅम वजनाचे २ सोनसाखळ्या व ५ ग्रॅम वजनाचे २ सोन्याचे वेल लंपास केले होते. या. बाबत पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन भोयर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली होती.
टाइम्स स्पेशल
याचवेळी फार्महाऊसमध्ये काम करणाऱ्या २ कामगारांवर पोलिसांनी संशय व्यक्त करत त्यांच्यावर वॉच ठेवला होता. या दोघांनीच सोन्याचे दागिने चोरल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखवल्यानंतर दागिने चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार दोघांवरही अटकेची कारवाई केली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.