ठाणे(प्रतिनिधी)- ठाण्यात रविवारच्या दिवशी दोन अज्ञाताचे मृतदेह सापडण्याच्या दोन घटना उघडकीस आल्या. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात अज्ञाताचे मृतदेह सापडण्याची पाचवी घटना आहे. रविवारी सकाळी 8.37 वाजण्याच्या सुमारास गणपती विसर्जन घाट जवळ, पारसिक-रेतीबंदर खाडीच्या किनार्यावर 40 वर्षीय अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला. तर रविवारीच दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अल्मेडा रोडवर एका सोसायटीच्या आवारातील झाडाला लटकलेल्या अवस्थेत 38 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने एकाच खळबळ उडाली. मृतदेह नौपाडा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला. रविवारी सकाळी 8.37 वाजण्याच्या सुमारास 40 वर्षीय अज्ञात पुरुषाचा मृतदेह गणपती विसर्जन घाट जवळ, पारसिक-रेतीबंदर खाडी, पारसिक नगर, कळवा, खाडीच्या किनार्यावर आढळला. घटनास्थळी कळवा पोलीस अधिकारी व कर्मचारी 01-शवावाहीकेसह, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी वाहनासह व अग्निशमन दलाचे जवानरेस्क्यू वाहनासह घटनास्थळी उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने खाडीतील मृतदेह बाहेर काढून कळवा पोलिसांच्या स्वाधीन केला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आला. रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या अल्मेडा रोडवरील गोल्डन हाऊस सोसायटी जवळ, अल्मेडा सिग्नलच्या बाजूला, अल्मेडा रोड, ठाणे येथे महिलेचा मृतदेह गोल्डन सोसायटीच्या आवारातील एका जांभळाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. सदर घटनास्थळी नौपाडा पोलीस अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन दल यांच्या मदतीने महिलेचा मृतदेह बाहेर काढून नौपाडा पोलीस कर्मचारी यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. नौपाडा पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे पाठविण्यात आला. ठाण्यात अज्ञाताचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडण्याची हि दुसरी घटना असून एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच मुंब्रा स्टेशनच्या लगत खाडीत झाडाला लटकलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर अल्मेडा रोडवर दुसरा महिलेचा मृतदेह आढळला.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.