चिपळूण - चिपळूण नगर परिषदेच्यावतीने लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ’वाचू आनंदाने’ या उपक्रमाच्या दुसर्या रविवारी शहरातील साने गुरुजी उद्यानात बरोबर 8 वाजता वाचनात लहान मुलांसह तरुण, ज्येष्ठ नागरिक मग्न झाले. दीड तास वाचना नंतर अर्धा तास ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांच्या काव्यवानात सर्व श्रोते रंगले. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी चिपळूण नगर परिषदेच्यावतीने वाचू आनंदाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दर रविवारी निसर्गाच्या सानिध्यात सकाळी आठ ते दहा या वेळेत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. साने गुरुजी उद्यानात रविवारी झालेल्या या उपक्रमात प्रांताधिकारी आकाश लिगाडे, साहित्यिक प्रकाश देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार योगेश बांडागळे, रामशेठ रेडीज. चिपळूण नगर पालिकेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधिक्षक रोहित खाडे, उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, सुजित जाधव, वैभव निवाते, संतोष शिंदे. नगर अभियंता दिपक निबांळकर, आनंद बामणे, निलेश भालेकर. लोटीस्मा चे कवी अरुण इंगवले, विनायक ओक. आंबेडकर वाचनालय कार्याध्यक्ष सुनील खेडेकर , संचालक प्रदिप पवार, प्राची जोशी, विलास महाडिक गुरुजी, समिर कोवळे, सुहास चव्हाण, मंगेश खेडेकर सर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, शिक्षक विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन्ही वाचनालयांच्यावतीने त्याच्या कर्मचार्या सह पुस्तके उपलब्ध करून ठेवण्यात आली होती. साने गुरुजी उद्यानात वेगवेगळ्या ठिकाणी बसून सर्वांनी वाचनाचा आनंद घेतला. माजी नगरसेवक व यशस्वी उद्योजक रामशेठ रेडीज हे आपल्या नातीसह या उपक्रमात सहभागी झाले होते व नातीला पुस्तक वाचून दाखवत होते. हा क्षण अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला. वूमन सपोर्ट वुमनच्या डॉ. कांचन मदार व त्यांच्या सहकारीही या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. संगीता लोटे यांचे इच्छामरण हे पुस्तक सध्या चर्चेत आहे. हे पुस्तकही येथे वाचनासाठी ठेवण्यात आले होते. स्वतः संगीता लोटेही या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. वाचनानंतर प्रकाश देशपांडे यांनी कवी माधव यांच्या कवितांचे वाचन केले. तसेच प्रांताधिकारी यांनी वाचनाचे महत्त्व सांगून वाचन आणि दैनंदिन पालावयाचे नियम व त्याबदल महत्व सांगितले तसेच आरोग्य निरीक्षक सुजित जाधव यांनी आपल्या मनोगतामध्ये वाचनामुळे नागरिकामुळे देशामध्ये काय बदल घडू शकतो हे उदाहरण देवून सांगितले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची जोशी यांनी केले, तर आभार आंबेडकर वाचनालयाच्या प्रदीप पवार यांनी मानले. पुढील रविवारी शहरातील पाग येथील गार्डनमध्ये वाचू आनंदाने हा उपक्रम होणार आहे, असे या वेळी जाहीर करण्यात आले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.