loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रंगीत धाग्यांपासून विणली प्रतिमा; श्रेया चांदरकरची अप्रतिम चित्रकृती ---

मालवण(प्रतिनिधी)- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती देशभर उद्या सोमवारी साजरी केली जात असतानाच डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला युवा चित्रकर्ती आणि कट्टा येथील वराडकर हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी श्रेया समीर चांरकर हिने विविध रंगीत धाग्यांचा उपयोग करत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र विणून अभिवादन केले. दरवर्षी 14 एप्रिलला देशभरात साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांना भारतीय संविधानाचे जनक म्हणूनही ओळखले जाते. डॉ. आंबेडकर यांचे सुरुवातीचे आयुष्य संघर्षांनी व्यापलेले होते. मार्गात आलेल्या सर्व अडचणींवर मात करून त्यांनी समाजात जे मोठे स्थान मिळवलं आणि देशाच्या स्वातंत्र्यासह संविधानासाठी दिलेले योगदान आजही देशवासीयांच्या स्मरणात कायम आहे. समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांचे प्रेरणास्थान असणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जग बदलायचं असेल तर शिक्षण घ्या, संघटित व्हा हा मूलमंत्र दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून प्रेरित होऊन वराडकर हायस्कुल कट्टा ची विद्यार्थीनी आणि युवा चित्रकार कुमारी श्रेया समीर चांदरकर हिने विविध रंगीत धाग्यांचा उपयोग करत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र विणले. हे चित्र विणण्यासाठी तिला सात दिवसांचा कालावधी लागला. रंगीत धाग्यांपासून विणलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे जगातील पहिले चित्र असावे. यापूर्वी तिने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, विठ्ठल, गौतम बुद्ध अशी विविध चित्रे रंगीत धाग्यांपासून साकारली आहेत. तिच्या या नाविन्यपूर्ण कलाकृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg