दापोली (शशिकांत राऊत) - आडे उटंबर खाडी ही पूर्णपणे गाळाने भरली आहे. खाडीतील पाण्याच्या पात्राची जागा गाळाने घेतली आहे. त्यामुळे होड्या किनार्यावर आणताना मासेमारांची मोठीच दमछाक होत आहे. गाळ काढण्यासाठी सरकार दरबारी अनेकदा अर्ज विनंत्या करण्यात आल्या आहेत. सातत्याने लोकप्रतिनिधींसह अधिकार्यांच्या प्रत्यक्षात गाठीभेटी घेण्यात आलेल्या आहेत तरीसुद्धा अजून काही आडे उंटबर खाडीत साचलेला गाळ काढण्याचा मुहुर्त काही केल्या मिळत नाही. दापोली तालुक्यातील आडे उंटबरची खाडी ही स्वच्छ आणि ताजी मासळी मिळण्याचे एक प्रसिध्द ठिकाण आहे. अशा या खाडीत साचलेला गाळ हा आजवर कधीही काढला गेलेला नाही. त्यामुळे मासेमारी व्यवसायावर उदरनिर्वाह असलेल्या येथील मासेमारांनी समुद्रातून जावून होडयांव्दारे पागून आणलेल्या मासळीच्या होडया या खाडी किना-यावर आणून सुरक्षित लावताना मच्छिमारांच्या होड्या या गाळात रुतण्याचे प्रकार घडत आहेत.
दापोली तालुक्यातील आडे उटंबर हे ताजी मासळी मिळण्याचे एक ठिकाण आहे. येथील छोटे मच्छीमार हे पूर्वापार मासळीचा व्यवसाय करत आले आहेत. मासेमारांनी समुद्रातून मासे मारून आणलेल्या छोट्या होड्यांना आडे उटंबरकडील किनार्यावर आणताना मासेमारांना खूपच मोठी कसरत करावी लागते. उधानांची भरती तसेच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा येथील किनार्यावरील निवासी वस्तींला पाण्याच्या वेढयाचा धोका पोहोचतो. आडे उटंबरची खाडी गाळाने पूर्णपणे भरल्याने भरतीच्या उधानाचे पाणी तसेच पावसाळ्यात इळणे गावाकडून समुद्राला जाऊन मिळणा-या केसरी नदीसह आतगाव तसेच आंबवली बुद्रुक रोवले या गावाकडून वाहणार्या नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याच्या लोटाने आडे उटंबरच्या निवासी वस्तीत पाणी उलटण्याचा प्रकार पावसाळ्यात घडत असतो. त्यामुळे येथील स्थानिक रहीवासी वस्तीला मोठा धोका निर्माण होतो.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.