loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यावर तिहेरी संकट, पुढील 24 तास धोक्याचे

पुणे: राज्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत असून आस्मानी संकट परत येत आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, आज रोजी महाराष्ट्रात हवामान संमिश्र स्वरूपाचं असेल. राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस, उष्णता आणि दमटपणा यांचा अनुभव येईल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात वादळी वारे 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहतील आणि विजांचा कडकडाटही अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकण किनारपट्टीवर मात्र हवामान प्रामुख्याने कोरडं राहील, पण काही ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.डोंगराळ भागात तुरळक पाऊस पडेल मुंबई, ठाणे आणि पालघरसारख्या शहरांमध्ये तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअसदरम्यान राहील, तर आर्द्रता 70 ते 80 टक्के पर्यंत असेल. यामुळे दुपारच्या वेळी उकाडा जाणवू शकतो. पुणे, नाशिक आणि सातारा यांसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील शहरांमध्ये तापमान 36 ते 39 अंशांपर्यंत जाऊ शकते, पण संध्याकाळी पावसामुळे थोडीसा गारवा राहण्याची शक्यता आहे.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg