वरवेली (गणेश किर्वे) : गुहागर दुर्गादेवी ग्रामस्थ मंडळ वरचापाट दुर्गादेवीवाडी यांच्यावतीने गुहागर तालुक्यातील पंचरस समाज बांधवांचा श्री भैरी व्याघ्रांबरी देवीचा पालखी समा महोत्सव दुर्गादेवी वाडीतील कल्पेश हरिचंद्र जांगळी यांच्या घराच्या अंगणात उत्साहात संपन्न झाला.
गुहागर शहरातील श्री दुर्गादेवीवाडी येथे श्री भैरी व्याघ्रांबरी देवीची पालखी गुहागर शहरातील भाविकांच्या दर्शनासाठी घरोघरी फिरत आहे. अशा या कार्यक्रमांमध्ये समा (लोटण्या) हा कार्यक्रम मुख्य कार्यक्रम समजला जातो. श्री दुर्गादेवी ग्रामस्थ मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या या समा महोत्सवामध्ये तालुक्यातील पंचरस समाजातील श्री संत संताजी मंडळ गुहागर तेलीआळी, हेमंत तिवरेकर आणि मंडळी वेळणेश्वर, मधुकर गावंणग, श्री कीर्तन वाडी ग्रामस्थ मंडळ भागडे विभाग, अविनाश कावणकर आणि मंडळी असगोली, श्री नवलाई ग्रामस्थ मंडळ रवींद्र मोहित, हेदवी, शैलेश भुते आणि मंडळी साखरीआगर, श्री सुंकाई देवी ग्रामस्थ मंडळ अडूर, श्री व्याघ्रांबरीदेवी ग्रामस्थ मंडळी नरवण असे एकूण नऊ मंडळी सहभागी झाली होती. या कार्यक्रमांमध्ये कल्पेश हरिचंद्र जांगळी व कुटुंबीय, पंचरस मंडळाचे अध्यक्ष अरुण रहाटे, उपाध्यक्ष राजेंद्र भागडे, सचिव रवींद्र मोहित, सहसचिव उमेश शिंदे यांचा श्री दुर्गादेवी ग्रामस्थ मंडळाच्यावतीने भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पंचरस समाजातील मंडळ प्रमुख व खांदेली यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
कोकणातील गावागावांमध्ये देवीला गार्हाणे घालण्याचा आणि मर्दाणी खेळ देव नसलेल्या पालखीबरोबर लोटण्या घेण्याचा हा शिमगोत्सवामध्ये मुख्य आकर्षण असतो. तालुक्यामध्ये होणारा समा लोटणी उत्सवाची शेकडो वर्षांची परंपरा आजही पंचरस समाज वर्षानुवर्षे जोपासत आहे. समा याचा खरा अर्थ सर्व समाजासाठी समानता व एकत्र आणणारा उत्सव, सर्व समाजाला एकत्र आणण्यासाठी सुरू झालेली परंपरा आजही सुरू आहे. आजही वर्षभरात अनेक गावांमध्ये हा उत्सव पारंपरिकरित्या देवीची पालखी घराघरात फिरू लागल्यानंतर ग्रामदेवीच्या साक्षीने देवीच्या पालखीसमोर हा उत्सव उत्साहात साजरा केला गेला.पारंपरिक पद्धतीने खेळवला जाणारा हा समा महोत्सव पहाटेपर्यंत सुरू होता. महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सांगळे यांनी केले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.