loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रदुषण विरोधी संघर्ष कृती समिती नांदिवडेचे बेमुदत धरणे आंदोलन

रत्नागिरी (वार्ताहर) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिंदाल गॅस टर्मिनल लोक वस्तीतून स्थलांतरीत व्हावे या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. १२ डिसेंबर २०२४ रोजी जिंदाल कंपनीच्या माध्यमातून झालेल्या गॅस वायुगळतीमुळे परिसरातील शेकडो विद्यार्थी बाधित झाले. या संदर्भातील कंपनी प्रशासनाच्या विरोधातील लेखी तक्रार तहसीलदार रत्नागिरी यांनी जयगड पोलिस स्थानकात दिली. अजूनही अनेक विद्यार्थ्यांना त्या घटनेचा त्रास होत आहे. इतकेच नाही तर जिंदाल कंपनीच्या चुकीच्या धोरणांमुळे आज परिसरात मोठ्या प्रमाणात स्थानिक जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. येथील बागायती, पिण्याचे पाणी, आरोग्याचे प्रश्‍न ऐरणीवर आहेत मात्र देशाच्या हव्यासापोटी कंपनी प्रशासन ज्या गॅस वायुगळतीमुळे त्रास झाला तो गॅस साठवणूक करण्याकरिता नांदीवडे अंबुवाडी फाट्यावर लोकवस्तीमध्ये गॅस टर्मिनल उभारित आहे. हे टर्मिनल लोकवस्तीतून स्थलांतरीत व्हावे या मागणीसाठी आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या समितीचे अध्यक्ष शंकर तुकाराम घाणेकर आहेत. त्यांनी प्रसार माध्यमांना आंदोलनाची माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg